Samsung Galaxy S25 Series चा चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. S सीरिजचे आधीचे स्मार्टफोन्स हिट झाल्यानंतर, आता Samsung आपली आगामी गॅलेक्सी S25 सीरिज नवीन अपग्रेड्ससह लाँच करण्याच्या तयारीत आहे. Times of India च्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, कंपनी जानेवारी 2025 मध्ये गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटद्वारे S25 सीरिजचे सादरीकरण करू शकते.
या सीरिजमध्ये चार मॉडेल्स असतील— Vanilla Galaxy S25, Galaxy S25+, Galaxy S25 Ultra, आणि Galaxy S25 Slim या नवीन व्हेरिएंटचा समावेश असण्याची शक्यता आहे.
भारतात Samsung Galaxy S25 Ultra च्या लॉन्च डेटबाबत माहिती (संभावित)
सध्या Samsung Galaxy S25 Ultra च्या अधिकृत लॉन्च डेटची घोषणा झालेली नाही, पण अफवांमुळे याबाबत चर्चा वाढली आहे. ऑनलाइन मिळालेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी 2025 रोजी भारत आणि इतर बाजारपेठांमध्ये हा फोन लाँच केला जाऊ शकतो.
भारतातील Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत (संभावित)
यावर्षी जानेवारीत लाँच झालेल्या Samsung Galaxy S24 Ultra ची सुरुवातीची किंमत ₹1,29,999 होती. Galaxy S25 Ultra च्या किंमतीसुद्धा याच दरम्यान असण्याची शक्यता आहे. मात्र, नक्की किंमत लॉन्च इव्हेंटदरम्यान समजेल.
Samsung Galaxy S25 Ultra चे संभाव्य खास फीचर्स
Samsung Galaxy S25 Ultra मध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेट असण्याची अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन नवीन Galaxy AI Features सह सुसज्ज असेल. यामध्ये सुधारित एआय प्रोसेसिंगसह 200MP रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
फोनमध्ये 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 3x व 10x ऑप्टिकल झूमसह दोन टेलीफोटो लेन्स असतील. 100x Space Zoom ही देखील या फोनची खासियत असेल. डिस्प्ले बाबतीत, हा फोन 120Hz रिफ्रेश रेट असलेली 6.9 इंच Dynamic AMOLED 2X Display प्रदान करू शकतो.