Samsung गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशनच्या (Galaxy Z Fold Special Edition) लाँचनंतर, सॅमसंग आता Galaxy S25 Slim या नव्या फ्लॅगशिप फोनवर काम करत आहे. सांगितलं जातंय की हा नवीन फोन स्लीक आणि स्लिम प्रोफाइलसह येईल आणि अनेक हेवी स्पेक्ससह सज्ज असेल.
गिज्मोचायना (Gizmochina) च्या रिपोर्टनुसार, हा एडिशन सॅमसंगच्या “पतले आणि हलके” दृष्टिकोनाची पुनरावृत्ती दर्शवतो, ज्याचा प्रयोग कंपनीने जवळपास दशकभरापूर्वी गॅलेक्सी अल्फा (Galaxy Alpha) सारख्या डिव्हाइसेससह केला होता. गॅलेक्सी अल्फा केवळ 6.7 एमएम जाडीचा होता. फ्लॅगशिप लाइनअपमध्ये एक पतले मॉडेल परत आणून, सॅमसंगचा उद्देश अशा युजर्सची आवश्यकता पूर्ण करण्याचा आहे ज्यांना फ्लॅगशिप फीचर्स न गमावता हलका आणि कॉम्पॅक्ट डिव्हाइस हवा आहे.
Galaxy S25 Slim मध्ये काय असेल खास
गॅलेक्सी S25 स्लिममध्ये अत्याधुनिक कॅमेरा सिस्टम असण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध टिप्स्टर आइस युनिव्हर्सने (Ice Universe) वीबोवर (Weibo) संकेत दिला आहे की गॅलेक्सी S25 स्लिममध्ये 200-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असू शकतो. हा कॅमेरा अल्ट्रा-लेवल सेन्सरसारखा असेल, ज्याचा वापर सॅमसंगने आपल्या अल्ट्रा फ्लॅगशिपमध्ये आधीपासूनच केला आहे. उल्लेखनीय म्हणजे सॅमसंगने नुकत्याच लाँच झालेल्या गॅलेक्सी झेड फोल्ड स्पेशल एडिशनमध्ये 200 मेगापिक्सेल सेन्सरचा वापर केला आहे.
मॉडेल क्रमांक SM-S937 असलेल्या Galaxy S25 Slim ला आधीच IMEI डेटाबेससह विविध नियामक फाईलिंगमध्ये पाहिलं गेलं आहे. या नियामक डेटाबेसमध्ये असणं हे सूचक आहे की हा फोन बाजारात येण्यापूर्वी टेस्टिंग आणि मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
S25 स्लिम हा S25 लाइनअपचा एक भाग असेल आणि या लाइनअपमध्ये गॅलेक्सी S25 (SM-S931), गॅलेक्सी S25+ (SM-S936) आणि गॅलेक्सी S25 अल्ट्रा (SM-S938) समाविष्ट होतील. सध्या, गॅलेक्सी S25 स्लिमच्या नेमक्या डाइमेंशन आणि जाडीबद्दल माहिती उपलब्ध नाही, परंतु स्टँडर्ड S25 मॉडेलपेक्षा त्यात लक्षणीय फरक असण्याची शक्यता आहे.
ऍपल देखील आणत आहे स्लिम मॉडेल
फ्लॅगशिप लाइनअपमध्ये अल्ट्रा-थिन डिझाइन आणणारा सॅमसंग हा एकमेव प्रमुख ब्रँड नाही. सॅमसंगच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांपैकी एक असलेल्या ऍपल (Apple) नेही आगामी iPhone 17 सीरीजचा ‘स्लिम’ किंवा ‘एअर’ व्हर्जन विकसित करत असल्याचे सांगितले जात आहे. हा फोन सध्याच्या iPhone Plus मॉडेलची जागा घेईल, ज्यामुळे ऍपल फॅन्सना 2025 च्या फ्लॅगशिप लाइनअपमध्ये एक लाइटवेट मॉडेल उपलब्ध होईल.