Samsung युजर्सना नवीन गॅलेक्सी S25 (Galaxy S25) स्मार्टफोन सिरीजची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ही सॅमसंगची आतापर्यंतची सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन सिरीज असेल, अशी अपेक्षा आहे. या फोनबाबत मार्केटमध्ये अनेक लीक समोर येत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग या नवीन फोनसह ऍपलसारखा (Apple) लूक देणार आहे. सोशल मीडियावर नवीन युजर इंटरफेस ऍपल आयफोनप्रमाणेच (Apple iPhone) दिसत असल्याचे व्हायरल होत आहे.
Galaxy S25 Ultra चा लीक झालेला मॉकअप
टेक लीकर @IceUniverse ने X (पूर्वी Twitter) वर एक मॉकअप शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रीमियम गॅलेक्सी S25 अल्ट्रा (Galaxy S25 Ultra) सॅमसंगच्या नवीन Android 15 ओवरलेसह कसा दिसेल हे दाखवले आहे. यात नवीन कंट्रोल सेंटर दाखवण्यात आले आहे.
One UI 7 + Galaxy S25 Ultra pic.twitter.com/VqHfJZ88Ir
— ICE UNIVERSE (@UniverseIce) October 7, 2024
Galaxy S25 सिरीजमध्ये मोठ्या अपडेट्सची अपेक्षा
One UI 7 च्या कंट्रोल सेंटरला नव्याने डिझाइन केले गेले आहे, ज्यामुळे ते लूकमध्ये आयफोनसारखे दिसते. यात गोलाकार कॉर्नर आणि समान आकाराचे कंट्रोल विजेटसह स्प्लिट नोटिफिकेशन देण्यात आले आहे. लीकनुसार, One UI 7 मधील अॅप ड्रॉअर, होम स्क्रीन आणि सेटिंग्ज अॅपमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे पूर्वीच्या लीक्सची पुष्टी होते. बॅटरी इंडिकेटर आणि कॅमेरा अॅप देखील नव्याने डिझाइन केले आहे, ज्यामध्ये कंट्रोल्स खाली दिले आहेत. या अपडेटमुळे One UI 7 मध्ये संपूर्ण व्हिज्युअल बदल होईल, असे दिसते.
Android 15 अपडेटमध्ये होणारी देरी
सॅमसंगने या वर्षी Android 15 अपडेटमध्ये उशीर केला आहे. हा अपडेट One UI 7 ओवरलेसह येणार आहे. सॅमसंग कंपनी AI फीचर्सवर अधिक फोकस करत आहे. याऐवजी कंपनी One UI 6.1.1 व्हर्जनला प्रमोट करत आहे.