Amazon Diwali Sale: आजकाल फोन खरेदी करताना त्याच्या कॅमेर्याची तपशीलवार माहिती पाहिली जाते. अनेक वेळा फोन हातात घेतल्यावर सर्वात आधी कॅमेरा उघडला जातो. येथे आम्ही अशा स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत ज्यांचा कॅमेरा सुरू होताच लोक त्याचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाहीत.
या यादीत Google Pixel, iPhone, Vivo, आणि Samsung यांसारख्या ब्रँड्सचे फोन आहेत, मात्र आम्ही खासकरून Samsung Galaxy S23 आणि Samsung Galaxy S23 Ultra यावरील आकर्षक ऑफरची माहिती देणार आहोत. हे दोन्ही स्मार्टफोन तुम्हाला मोठ्या सवलतीत उपलब्ध होत आहेत, आणि तुम्ही हे फोन त्यांच्या लॉन्च किंमतीपेक्षा खूपच कमी दरात खरेदी करू शकता.
Samsung Galaxy S23
या फोनची मूळ किंमत 89,999 रुपये आहे, परंतु अमेझॉनवर तुम्हाला तो 52% सवलतीसह फक्त 42,998 रुपयांत मिळत आहे. शिवाय, प्लॅटफॉर्मवर 25,700 रुपये पर्यंतचा एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे, ज्यामुळे हा फोन आणखी कमी किमतीत खरेदी करता येईल. जर तुम्हाला एकरकमी पैसे देणे शक्य नसेल, तर नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही घेऊ शकता.
Samsung Galaxy S23 Ultra
Samsung Galaxy S23 Ultra चा 256GB स्टोरेज वेरिएंट मूळतः 1,49,999 रुपयांना मिळतो, परंतु अमेझॉनवर तो 50% सवलतीसह तुम्हाला फक्त 74,999 रुपयांत उपलब्ध आहे. शिवाय, एक्सचेंज ऑफर वापरल्यास, 25,700 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त सवलतीसह तुम्ही हा फोन 49,299 रुपयांत घेऊ शकता. जर तुम्हाला हा फोन ईएमआयवर घ्यायचा असेल, तर दरमहा फक्त 3,636 रुपये देऊन तुम्ही खरेदी करू शकता, तसेच इतर ईएमआय प्लान्सही निवडता येतील.