साऊथ कोरियन टेक कंपनी Samsung ने आपला नवीन Galaxy F06 5G स्मार्टफोन F-सीरीजमध्ये बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे. कंपनीने हा फोन सर्वात किफायतशीर 5G फोन म्हणून आणला आहे आणि याला चार वर्षांपर्यंत Android OS अपडेट्स दिले जातील. दमदार परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Samsung ने आपल्या नवीन फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला असून यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा मिळतो. भारतात Galaxy F06 5G कंपनीच्या अधिकृत वेबसाइट तसेच Flipkart वरून खरेदी करता येईल. ग्राहकांना ऑफलाइन मार्केटमध्येही हा डिवाइस खरेदी करण्याचा पर्याय दिला जाईल. हा नवीन स्मार्टफोन बहमामा ब्लू (Bahama Blue) आणि लिट वायलेट (Light Violet) या दोन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे.
Galaxy F06 5G चे स्पेसिफिकेशन्स
Galaxy F06 5G मध्ये 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 800nits पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. दमदार परफॉर्मन्ससाठी यात MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर मिळतो. हा डिवाइस 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यंतच्या व्हेरियंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. Samsung च्या माहितीनुसार, या फोनला AnTuTu बेंचमार्क वर 4,16,000 पॉइंट्स मिळाले आहेत. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित OneUI 7.0 वर चालतो आणि याला चार वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट्स दिले जातील.
कॅमेरा सेटअपबाबत बोलायचे झाल्यास, या डिवाइसच्या बॅक पॅनलवर 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी असून ती 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या डिवाइसला एक डझन 5G बँड्स सपोर्ट मिळतो.
Galaxy F06 5G ची किंमत किती ठेवली आहे?
नवीन Samsung Galaxy F06 5G स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरियंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे.
- 4GB RAM + 128GB स्टोरेज: ₹10,999
- 6GB RAM + 128GB स्टोरेज: ₹11,499
तसेच, या दोन्ही व्हेरियंट्सवर ₹500 चा बँक कॅशबॅक देखील मिळत आहे.