Samsung Galaxy F05 Launched in India: भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड Samsungने 17 सप्टेंबर रोजी एक नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन Samsung Galaxy F05 आहे. सॅमसंगचा हा फोन कंपनीच्या F सिरीजमधील नवीनतम फोन असून, स्टायलिश डिझाइन आणि उत्तम फीचर्ससह आला आहे. या फोनची खासियत म्हणजे कमी किमतीत मिळणारा 50MP कॅमेरा. चला, या फोनबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
Samsung Galaxy F05 ची किंमत, फर्स्ट सेल डेट आणि उपलब्धता
सॅमसंगने गॅलेक्सी F05 फक्त 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. या फोनची स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन Twilight Blue रंगात सादर करण्यात आला आहे. Samsung Galaxy F05 रोमांचक लाँच ऑफरसह 20 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. सॅमसंग गॅलेक्सी F05 Flipkart, Samsung.com आणि निवडक रिटेल स्टोअर्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असेल.
Samsung Galaxy F05 चे फीचर्स आणि स्पेक्स
कॅमेरा: सॅमसंगच्या या फोनमध्ये उत्कृष्ट कॅमेरा आणि डिझाइन आहे. Galaxy F05 एक स्टायलिश Leather Pattern डिझाइनसह आला आहे, जो फोनचा लूक प्रीमियम बनवतो. गॅलेक्सी F05 मध्ये 50MP ड्युअल कॅमेरा (50MP Dual Camera) आहे, ज्यामुळे यूजर्सला चांगल्या दर्जाचे फोटो काढता येतील. याशिवाय, फोनमध्ये 2MP डेप्थ-सेंसर (2MP Depth Sensor) कॅमेरा मिळतो. फ्रंटसाठी, गॅलेक्सी F05 मध्ये 8MP सेल्फी कॅमेरा (8MP Selfie Camera) आहे.
प्रोसेसर: उत्तम परफॉरमेंस आणि फास्ट मल्टीटास्किंगसाठी MediaTek Helio G85 Processor दिला आहे. Galaxy F05 मध्ये RAM Plus Feature सोबत 8GB पर्यंत रॅम (8GB RAM) आहे. स्टोरेजची चिंता करण्याची गरज नाही, कारण गॅलेक्सी F05 मध्ये 1TB पर्यंत एक्सपेंडेबल स्टोरेज (1TB Expandable Storage) उपलब्ध आहे.
बॅटरी: सॅमसंग गॅलेक्सी F05 मध्ये 6.7 इंचाचा HD+ Display आहे, जो ब्राउझिंग, गेमिंग आणि बिंज वॉचिंगसाठी परफेक्ट आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी (5000mAh Battery) आहे, जी दीर्घकाळ वापरासाठी योग्य आहे. तसेच, Galaxy F05 25W फास्ट चार्जिंग (25W Fast Charging) ला सपोर्ट करतो, ज्यामुळे अधिक पावर मिळते.
सॉफ्टवेअर: गॅलेक्सी F05 Android 14 सह येतो. या फोनला दोन वर्षे ओएस अपग्रेड (OS Upgrade) आणि चार वर्षांचे सुरक्षा अपडेट्स (Security Updates) मिळतील. याशिवाय, फोनमध्ये फेस अनलॉक (Face Unlock) चा सपोर्ट देखील आहे.