जर तुम्हाला तुमचा 4G स्मार्टफोन बदलून 5G तंत्रज्ञानात स्विच करायचं असेल, तर कमी किंमतीत Samsung Galaxy A14 5G तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. खरं तर, गेल्या वर्षी कंपनीने लॉन्च केलेल्या A14 5G वर 8,000 रुपयांची सवलत मिळत आहे. एवढंच नाही, तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफर्सचाही लाभ घेऊ शकता. विशेष म्हणजे, हा डिवाइस भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय ठरला असून त्याला ऑनलाइन शॉपिंग साइटवर चांगली रेटिंग मिळाली आहे. चला तर मग, पुढे जाणून घेऊया नवीन किंमत, सेलिंग प्लॅटफॉर्म आणि वैशिष्ट्ये सविस्तरपणे.
Samsung Galaxy A14 5G ऑफर्स आणि किंमत
Samsung Galaxy A14 5G चा 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 8,000 रुपयांच्या डिस्काउंटसह फक्त 10,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. त्याची लॉन्च किंमत 18,999 रुपये होती.
फोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेज ऑप्शनची किंमत फक्त 9,999 रुपये आहे.
Samsung Galaxy A14 5G चा सर्वात लो मॉडेल 7,500 रुपयांच्या सवलतीसह फक्त 8,999 रुपयांना उपलब्ध आहे. लाँचवेळी त्याची किंमत 16,499 रुपये होती.
बँक ऑफरच्या बाबतीत, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल.
एक्सचेंज ऑफरनुसार, कंपनीकडून जुना फोन एक्सचेंज केल्यास 6,100 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, मात्र ती डिवाइसच्या स्थितीनुसार ठरेल.
Samsung Galaxy A14 5G ब्लॅक, डार्क रेड आणि लाइट ग्रीन अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Samsung Galaxy A14 5G कुठे खरेदी करावा?
वरील सर्व ऑफर्ससह हा डिवाइस फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. याशिवाय, तो कंपनीच्या वेबसाइटवर आणि ऑफलाइन स्टोअर्समध्येही मिळेल. येथे आम्ही फक्त फ्लिपकार्ट ऑफर्स सांगितल्या आहेत. कंपनीच्या वेबसाइट आणि रिटेल आउटलेट्सवर ऑफर्स आणि किंमती वेगळ्या असू शकतात.
Samsung Galaxy A14 5G चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: Samsung Galaxy A14 5G मध्ये 6.6 इंचाचा मोठा HD+ IPS LCD पॅनेल देण्यात आला आहे. यावर 90Hz रिफ्रेश रेट आणि 1,080×2,408 पिक्सल रिझोल्यूशन मिळते.
चिपसेट: Samsung Galaxy A14 5G हा Exynos 1330 चिपसेटसह सुसज्ज आहे.
रॅम आणि स्टोरेज: डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येऊ शकते.
बॅटरी: 15W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे.
कॅमेरा: Samsung Galaxy A14 5G च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा डेप्थ लेंस आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 13MP चा सेन्सर आहे.
कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये 5G, 4G, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, GPS आणि USB टाइप-C पोर्ट दिले आहे.
ओएस: हा सॅमसंग फोन Android 13-आधारित OneUI 5.0 वर आला आहे, आणि त्यास दोन OS अपडेट्स मिळतील.