Samsung Christmas Offers: भारतातील आघाडीचा कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने ख्रिसमस सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या लेटेस्ट गॅलेक्सी वेअरेबल्सवर मोठी सूट मिळत आहे. स्मार्टवॉच (Smartwatch) आणि इअरबड्स (Earbuds) खरेदीवर 12,000 रुपयांपर्यंत कॅशबॅकच्या स्वरूपात सूट दिली जात आहे.
Samsung ख्रिसमस सेल ऑफर्स
सॅमसंगकडून लेटेस्ट स्मार्टवॉच आणि इअरबड्स खरेदी करणाऱ्यांना 10,000 रुपयांपर्यंत अपग्रेड बोनस तसेच 24 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा पर्याय दिला जात आहे. याशिवाय, 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान Samsung.com वर “सॅमसंग लाईव्ह” इव्हेंटमध्ये गॅलेक्सी रिंग खरेदी करणाऱ्या ग्राहकांना गिफ्ट स्वरूपात सॅमसंग 45W ट्रॅव्हल अडॅप्टर मिळणार आहे.
Galaxy Watch Ultra सेल ऑफर्स आणि फीचर्स
Galaxy Watch Ultra ही टायटॅनियम-ग्रेड फ्रेमसह येते. यावर 12,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि 10,000 रुपयांचा अपग्रेड बोनस मिळतो. यासोबत 24 महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI चा पर्याय दिला जातो.
गॅलेक्सी वॉच अल्ट्राची किंमत सॅमसंगच्या साइटवर ₹59,999 आहे. या वॉचमध्ये 1.5-इंचाची सुपर AMOLED ऑलवेज-ऑन डिस्प्ले असून, तिची ब्राइटनेस 3,000 nits आहे. ती 10ATM वॉटर रेसिस्टन्स प्रदान करते. यामध्ये 590mAh क्षमतेची बॅटरी असून, गॅलेक्सी वॉच लाईनअपमधील सर्वात जास्त बॅटरी लाईफ आहे. पॉवर-सेव्हिंग मोडमध्ये 100 तासांपर्यंत आणि एक्सरसाइज मोडमध्ये 48 तासांपर्यंत बॅटरी टिकते.
Galaxy Buds3 Pro सेल ऑफर आणि फीचर्स
Galaxy Buds3 Pro खरेदी केल्यावर 5,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळतो. यासोबत 24 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा पर्याय उपलब्ध आहे.
या बड्समध्ये 10.5mm डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. प्रत्येक बड्समध्ये 53mAh बॅटरी असून, चार्जिंग केसमध्ये 515mAh बॅटरी दिली आहे. ANC (Active Noise Cancellation) बंद केल्यास 7 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम मिळतो, तर केससह 30 तासांपर्यंत बॅटरी टिकते. ANC सुरू असल्यास बॅटरी लाईफ 26 तासांपर्यंत टिकू शकते. यामध्ये ब्लूटूथ 5.4 कनेक्टिविटी आणि कोडेक सपोर्ट देण्यात आला आहे.