Xiaomi च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी आपल्या रेडमी सब-ब्रँडअंतर्गत नवीन Note सिरीज भारतात सादर करण्याच्या तयारीत आहे. Redmi Note 14 Series चे फोन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होण्याची शक्यता आहे, आणि 10 ते 15 जानेवारीदरम्यान त्यांची विक्री सुरू होऊ शकते. ही सिरीज आधीच चीनमध्ये लॉन्च झाल्याने भारतातही यातील अनेक फीचर्स तशीच ठेवली जातील अशी अपेक्षा आहे.
रेडमी Note 13 सिरीजला भारतात खूप चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याचे अपग्रेडेड व्हर्जन म्हणून Redmi Note 14 सिरीज आणली जात आहे. या सिरीजअंतर्गत चीनमध्ये Redmi Note 14, Note 14 Pro आणि Note 14 Pro+ हे तीन फोन लॉन्च झाले आहेत. भारतातही हेच मॉडेल्स काही सुधारित वैशिष्ट्यांसह येण्याची शक्यता आहे.
Possible specifications of Redmi Note 14 series
Redmi Note 14 मध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसह असण्याची अपेक्षा आहे. यात MediaTek Dimensity 7025 Ultra चिपसेट असू शकतो, जो 12GB LPDDR5x रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसोबत येईल.
या मॉडेलमध्ये 50MP प्राइमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी लेंस असेल, तर सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. बॅटरी 5110mAh ची असेल, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
Redmi Note 14 Pro मध्ये 50MP प्राइमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड लेंस आणि 2MP मॅक्रो किंवा डेप्थ सेन्सर असण्याची शक्यता आहे. तसेच, फ्रंटला 20MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. या मॉडेलच्या चीनी व्हेरिएंटमध्ये 5500mAh बॅटरी असून ती 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Redmi Note 14 Pro+ मध्ये 90W फास्ट चार्जिंगसह 6200mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते, जी याला आणखी दमदार बनवते.