Redmi कंपनी सध्या Redmi K90 सिरीजवर काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. लिक्समधून Redmi K90 सिरीजबद्दल विविध तपशील उघड होत आहेत. Redmi K90 मध्ये कस्टम-डिझाइन केलेली 3nm+ चिप मिळण्याची शक्यता आहे, जी Qualcomm आणि Redmi यांच्या भागीदारीत विकसित करण्यात आली आहे. चला, Redmi K90 सिरीजबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Redmi K90 Pro ची किंमत
अफवांनुसार, Redmi K90 सिरीजसाठी किंमत वाढवण्याचा विचार केला जात आहे. एका रिपोर्टनुसार, Redmi K90 Pro ची किंमत 5,000 युआन (सुमारे ₹59,931) च्या आत असू शकते. असा अंदाज आहे की K90 Pro ची किंमत 4,000 ते 5,000 युआन दरम्यान असेल.
Redmi K90 चे स्पेसिफिकेशन्स
गेल्या आठवड्यात समोर आलेल्या लीकनुसार, Redmi K90 मध्ये Qualcomm आणि Redmi यांनी संयुक्तपणे विकसित केलेली कस्टम-डिझाइन 3nm+ चिप मिळण्याची शक्यता आहे. हा प्रोसेसर पूर्णपणे कस्टम आर्किटेक्चरवर आधारित असेल आणि याचा बेंचमार्क स्कोर Snapdragon 8 Elite इतकाच दमदार असण्याची अपेक्षा आहे.
आता टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनच्या नवीन लीकमधून या फोनच्या लाँचिंगविषयी माहिती मिळाली आहे. लीकनुसार, Redmi K90 सिरीज आपल्या मागील मॉडेलच्या तुलनेत लवकर लॉन्च केली जाईल, कारण K80 सिरीज नोव्हेंबरच्या अखेरीस लॉन्च करण्यात आली होती.
Redmi K90 सिरीज अपेक्षेपेक्षा लवकर लॉन्च होण्याची शक्यता आहे, पण अधिकृतरीत्या याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सध्याच्या लिक्सच्या आधारे Redmi K90 Pro मध्ये Snapdragon 8 Elite 2 चिप मिळू शकते. तसेच, यामध्ये 50MP पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये K80 Pro प्रमाणेच 2K रिझोल्यूशन असलेली फ्लॅट OLED डिस्प्ले दिली जाणार आहे.