Realme भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन Realme P3 Pro सादर करण्याच्या तयारीत आहे. Realme P2 Pro च्या अपग्रेडेड व्हर्जनमध्ये दमदार फीचर्स असतील. कंपनीने या फोनचे गेमिंग फीचर्स टीज करण्यास सुरुवात केली असून आज दिल्लीत Realme गेमिंग स्ट्रॅटेजी इव्हेंट आयोजित केला जात आहे. चला तर मग Realme P3 Pro बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कंपनीने आधीच Battlegrounds Mobile India Series (BGIS) 2025 आणि Battlegrounds Mobile India Pro Series (BMPS) 2025 साठी अधिकृत स्मार्टफोन स्पॉन्सर म्हणून भागीदारी जाहीर केली आहे.
रिपोर्टनुसार, Realme P3 Pro भारतात फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. हा आगामी स्मार्टफोन 12GB RAM + 256GB स्टोरेज या कॉन्फिगरेशनसह सादर केला जाऊ शकतो.
Realme P3 Pro स्पेसिफिकेशन्स
सध्या अधिकृत स्पेसिफिकेशन्स जाहीर करण्यात आले नाहीत. मात्र, लीक झालेल्या माहितीनुसार, P3 Pro हा Realme 14 Pro चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. त्यामुळे यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स ब्राइटनेस असलेली 6.77-इंचाची OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे, ज्याचे रेझोल्यूशन 1080 x 2392 पिक्सल असेल.
हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित Realme UI 6.0 वर चालेल, अशी शक्यता आहे. यामध्ये MediaTek Dimensity 7300 Energy (4nm) चिपसेट दिला जाऊ शकतो. कॅमेरा सेटअप पाहता, 50MP प्रायमरी कॅमेरा (OIS सपोर्टसह) आणि 2MP डेप्थ कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
अन्य फीचर्समध्ये स्टीरियो स्पीकर, ब्लूटूथ 5.4, Wi-Fi 6, NFC आणि USB Type-C 2.0 सपोर्ट दिला जाऊ शकतो. 6000mAh बॅटरी असलेला हा फोन 45W वायर्ड चार्जिंग ला सपोर्ट करेल. तसेच, IP68/IP69 सर्टिफिकेशनसह हा स्मार्टफोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित असेल.