Realme भारतात आपली P3 सिरीज लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या सिरीजमध्ये Realme P3, P3 Pro, P3 Ultra आणि P3x हे मॉडेल्स असतील, आणि त्यातील प्रो व्हेरिएंट सर्वप्रथम लॉन्च होण्याची शक्यता आहे. आता Realme P3 Pro ची अधिकृत लॉन्च डेट कन्फर्म झाली आहे. हा फोन 18 फेब्रुवारी 2025 रोजी बाजारात दाखल होणार आहे. हा स्मार्टफोन आपल्या सेगमेंटमधील पहिला असा फोन असेल जो Snapdragon 7s Gen 3 चिपसेटसह येईल.
फोनमध्ये 6000mAh टायटन बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. हा डिव्हाइस Flipkart आणि Realme.com वर उपलब्ध असेल. Flipkart वर या फोनसाठी डेडिकेटेड पेज (मायक्रोसाइट) लाईव्ह झाले आहे, ज्यामुळे हा फोन हाय फ्रेम-रेट गेमिंगला सपोर्ट करेल असे संकेत मिळतात. चला तर मग, Realme P3 सिरीज बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Realme P3 Pro ची संभाव्य किंमत
Realme P3 Pro 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च होणार आहे. यापूर्वी आलेला Realme P2 Pro तीन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध होता – 8GB/128GB, 12GB/256GB आणि 12GB/512GB, ज्याची सुरुवातीची किंमत ₹21,999 होती. रिपोर्ट्सनुसार, Realme P3 Pro च्या बेस व्हेरिएंटची किंमत सुमारे ₹25,000 पासून सुरू होऊ शकते.
Realme P3 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Realme P3 Pro च्या डिझाइनचे लीक समोर आले आहेत, ज्यात गोलाकार रियर कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. यामध्ये ड्युअल कॅमेरा सेन्सर आणि LED फ्लॅश दिले आहे. 50MP प्रायमरी सेन्सर, f/1.8 अपर्चर आणि 24mm फोकल लेंथ सपोर्टसह OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) देण्यात आले आहे. डिव्हाइस प्रीमियम आणि स्टायलिश लूकमध्ये येणार असून, सॅटर्न ब्राऊन, नेब्युला ग्लो आणि गॅलेक्सी पर्पल या तीन कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
Flipkart वरच्या टीझरनुसार, हा स्मार्टफोन हाय फ्रेम-रेट गेमिंगला सपोर्ट करेल आणि अॅडव्हान्स्ड कूलिंग सिस्टमसह येईल. गेमिंग अनुभव आणखी चांगला करण्यासाठी यामध्ये हाय टच सेन्सिटिविटी दिली जाणार आहे. हा फोन BGMI टूर्नामेंट सर्टिफाइड परफॉर्मन्स ऑफर करेल.
Realme ने आपल्या अधिकृत X (Twitter) हँडलवर याची पुष्टी केली आहे की, Realme P3 Pro मध्ये ‘GT Boost’ फीचर असेल, जो सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशनच्या मदतीने गेमिंग परफॉर्मन्स वाढवेल. हे फीचर सध्या Realme GT 7 Pro फ्लॅगशिप फोनमध्येच उपलब्ध आहे.
Realme ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, Realme P3 Pro मध्ये कर्व डिस्प्ले असेल हे स्पष्ट झाले आहे. हा फोन वॉटर-रेसिस्टंट असेल. तसेच, सर्टिफिकेशननुसार, यात 6000mAh ची बॅटरी आणि 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.