Realme च्या फ्लॅगशिप GT सीरीज (GT Series) स्मार्टफोनसाठी ही खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. सध्या Realme GT Neo 3T वर 10,200 रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. फोनवर सवलतींसोबत बँक ऑफर, एक्सचेंज आणि EMI पर्याय देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे हा फोन अधिक कमी दरात खरेदी करता येतो.
भारतीय बाजारात हा फोन प्रचंड लोकप्रिय ठरला असून, याला ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर 4.3 ची रेटिंग मिळाली आहे. चला तर मग, नवीन किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती घेऊया.
Realme GT Neo 3T: Offer & Price
Realme GT Neo 3T तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता.
- 8GB रॅम + 256GB स्टोरेज: या टॉप व्हेरियंटवर 10,200 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन आता फक्त 23,799 रुपयांना मिळतो, जो लॉन्च वेळी 33,999 रुपयांना उपलब्ध होता.
- 8GB रॅम + 128GB स्टोरेज: या मिड व्हेरियंटवर 9,600 रुपयांची सवलत आहे, ज्यामुळे याची किंमत 23,399 रुपये आहे. हा फोन लॉन्च वेळी 31,999 रुपयांना उपलब्ध होता.
- 6GB रॅम + 128GB स्टोरेज: बेस व्हेरियंटवर 9,000 रुपयांची सूट असून, आता तो 20,999 रुपयांना मिळतो. हा फोन लॉन्च वेळी 29,999 रुपयांचा होता.
Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना 5% अतिरिक्त कॅशबॅक मिळतो. तसेच, ग्राहकांना 24 महिन्यांपर्यंत EMI वर फोन खरेदी करता येतो.
एक्सचेंज ऑफरमध्ये जुन्या डिव्हाइसच्या बदल्यात 12,950 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र, यासाठी जुन्या फोनची स्थिती महत्त्वाची ठरेल.
फोन डॅश येलो, ड्रिफ्टिंग वाइट आणि शेड ब्लॅक या तीन रंगांत उपलब्ध आहे.
Realme GT Neo 3T: Specification
- डिस्प्ले: 6.62-इंचाचा Full HD+ E4 AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 1300 निट्स ब्राइटनेस, 16000-लेव्हल डिमिंग, आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येतो.
- प्रोसेसर: फोनमध्ये Snapdragon 870 चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी Adreno 650 GPU दिला आहे.
- रॅम आणि स्टोरेज: यात 8GB रॅमसह 256GB स्टोरेज मिळते. शिवाय, डायनॅमिक रॅम सपोर्टमुळे रॅम 16GB पर्यंत वाढवता येते.
- कॅमेरा: ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP प्रायमरी लेन्स, 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स, आणि 2MP डेप्थ लेन्स आहे. तर, 16MP फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी दिला आहे.
- बॅटरी आणि चार्जिंग: 5,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते.
- अतिरिक्त फीचर्स: फोनमध्ये Dolby Atmos ऑडिओ, VC कूलिंग टेक्नॉलॉजी, आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS, NFC, आणि USB Type-C पोर्टचा समावेश आहे.
Realme GT Neo 3T खरेदी करण्याचा विचार का करावा?
Realme GT Neo 3T हा स्मार्टफोन 2022 मध्ये लॉन्च झाला होता. त्यामुळेच कंपनी त्यावर मोठ्या प्रमाणावर सवलत देत आहे. प्रीमियम स्पेसिफिकेशन्ससह कमी किमतीत हा एक उत्तम पर्याय आहे. यात 64MP कॅमेरा, Snapdragon 870 प्रोसेसर, 16GB पर्यंत रॅम आणि Full HD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. जर तुम्हाला कमी किमतीत फ्लॅगशिप अनुभव हवा असेल, तर हा फोन खरेदी करण्याचा विचार करू शकता.