Realme आपली GT सीरीजमधील नवा स्मार्टफोन Realme GT 7 भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन Realme GT 6 चा सक्सेसर म्हणून बाजारात येऊ शकतो. मात्र, कंपनीने अद्याप अधिकृत लॉन्च डेट जाहीर केलेली नाही. दरम्यान, 91mobiles ने या आगामी फोनच्या भारतीय व्हेरिएंटच्या मेमरी आणि कलर ऑप्शन बद्दल माहिती लीक केली आहे. 91mobiles च्या अहवालानुसार, या फोनचा मॉडेल नंबर RMX5061 आहे.
12GB रॅम आणि 512GB स्टोरेज
पूर्वी हा मॉडेल नंबर Realme Neo 7 च्या भारतीय व्हेरिएंटसाठी असल्याचे मानले जात होते. मात्र, आता तो Realme GT 7 साठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. गीकबेंच (Geekbench) आणि 3C लिस्टिंगमध्ये हा फोन RMX5090 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
यावरून असे अनुमान काढले जात आहे की मार्केटनुसार वेगवेगळे मॉडेल नंबर ठेवण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, हा फोन किमान 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येईल. तसेच, तो आणखी काही स्टोरेज व्हेरिएंटमध्येही लॉन्च होण्याची शक्यता आहे.
Snapdragon 8 Elite चिपसेट असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन?
भारतात हा फोन ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होईल. तसेच, या फोनमध्ये NFC सपोर्ट आणि INT फीचर असण्याची शक्यता आहे. INT हे Apple च्या इंटरकॉम (Intercom) फीचरप्रमाणे असू शकते, ज्यामुळे HomePod किंवा HomePod Mini सारख्या डिव्हाइसद्वारे मेसेज सेंड आणि रिसीव्ह करता येतात. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह सर्वात स्वस्त फोन ठरू शकतो.
दमदार फीचर्स मिळण्याची शक्यता
3C आणि Geekbench लिस्टिंगमध्ये हा फोन आधीच दिसला आहे. गीकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये या फोनने 2914 पॉइंट्स, तर मल्टी-कोर टेस्टमध्ये 8749 पॉइंट्स मिळवले आहेत. फोनमध्ये Adreno 850 GPU आणि Snapdragon 8 Elite प्रोसेसर असेल. यामध्ये 16GB रॅम मिळू शकते. फोन Android 15 OS वर चालणार आहे. TENAA लिस्टिंगनुसार, या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा डिस्प्ले असेल.
कॅमेरा आणि बॅटरी
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP सेकंडरी लेंस मिळू शकतो. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 6310mAh बॅटरी असेल, जी 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल.