Realme ने आपले नवीन ट्रू वायरलेस इअरबड्स – Realme Buds Air 7 लॉन्च केले आहेत. सध्या हे बड्स चीनमध्ये सादर करण्यात आले असून त्यांची किंमत 299 युआन (सुमारे ₹3,600) आहे. हे बड्स गोल्ड, ग्रीन आणि पर्पल या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.
कंपनीने या बड्समध्ये उत्कृष्ट साउंड क्वालिटीसह शक्तिशाली बॅटरी दिली आहे, जी 52 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाइम देते. चला तर मग जाणून घेऊया Realme Buds Air 7 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
Realme Buds Air 7 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
उत्तम ऑडिओ अनुभवासाठी या बड्समध्ये 12.4mm टायटॅनियम प्लेटेड ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. बड्सची साउंड क्वालिटी सुधारण्यासाठी निओडायमियम N52 मॅग्नेट आणि कॉपर SHTW व्हॉईस कॉइल वापरण्यात आले आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या सेटअपमुळे वापरकर्त्यांना डीप बास, स्पष्ट मिड्स आणि ब्राइट हायसह लो डिस्ट्रक्शनचा जबरदस्त अनुभव मिळेल. हे नवीन इअरबड्स LHDC 5.0 ट्रान्समिशन सपोर्ट करतात, जे 96kHz सॅम्पलिंग रेट आणि 1000kbps ट्रान्समिशन स्पीड सह हाय-रेझोल्यूशन ऑडिओ स्ट्रीमिंग प्रदान करतात.
या बड्सचा उपयोग कंपॅटिबल डिव्हाइसेससोबत केल्यास क्रिस्प डीटेल्स, समृद्ध टेक्सचर आणि मिनिमल कंप्रेशन अनुभवता येईल. ऑडिओ अनुभव अधिक चांगला करण्यासाठी, कंपनीने या बड्समध्ये हाय, लो आणि मिड रेंजसाठी अॅडजस्टेबल फ्रिक्वेन्सी कंट्रोल दिले आहे. या सेटिंग्ज 3D Spatial Audio तंत्रज्ञानासह Realme Link अॅप च्या मदतीने कस्टमाइझ करता येतात.
हे बड्स 52dB इंटेलिजंट डीप सी नॉइज रिडक्शन 3.0 तंत्रज्ञानासह येतात. यामध्ये AI-पावर्ड नॉइज रिडक्शनसाठी 6-मायक्रोफोन दिले आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हे बड्स चार्जिंग केससह 52 तासांपर्यंत प्लेबॅक देतात, तर नॉइज कॅन्सलेशन ऑन केल्यास बॅटरी बॅकअप 30 तासांपर्यंत असतो.
हे बड्स क्विक चार्जिंग सपोर्ट करतात आणि फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 10 तासांचा प्लेबॅक देतात. हे बड्स IP55 रेटिंगसह येतात, त्यामुळे ते पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहेत.