खास AI फीचर्स, 12GB रॅम, 6000mAh बॅटरीसह Realme 14 5G स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत

Realme 14 5G स्मार्टफोन लॉन्च झाला आहे! 12GB RAM, 6000mAh बॅटरी, Snapdragon 6 Gen 4 SoC आणि प्रगत AI फीचर्स यांसह जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये.

On:
Follow Us

Realme ने आपला नवीन स्मार्टफोन Realme 14 5G मार्केटमध्ये सादर केला आहे. या फोनमध्ये 6.67-इंच FHD+ डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. यात AMOLED स्क्रीन आहे, ज्यामध्ये 16MP फ्रंट कॅमेरा बसवलेला आहे.

हा स्मार्टफोन Snapdragon 6 Gen 4 SoC प्रोसेसरसह येतो, जो 12GB रॅम सपोर्ट करतो. याच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचे मुख्य आकर्षण म्हणजे 6000mAh बॅटरी, जी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. चला तर जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स.

Realme 14 5G ची किंमत

Realme 14 5G हा स्मार्टफोन कंपनीने मलेशियामध्ये लॉन्च केला आहे. याच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 Thai Baht (सुमारे ₹30,000) आहे. हा फोन Mecha Silver, Storm Titanium आणि Warrior Pink अशा तीन कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. हा डिव्हाइस थायलंडमध्ये कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह विविध ऑनलाइन रिटेलर्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Realme 14 5G चे स्पेसिफिकेशन्स

Realme 14 5G मध्ये 6.67-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन नवीन Mecha डिजाइनसह येतो आणि यात स्पेस सिल्वरसह इतर दोन रंगांचे पर्याय देण्यात आले आहेत. GT Boost फीचर या फोनमध्ये देण्यात आले असून, त्यामुळे परफॉर्मन्स वाढतो.

तसेच, AI मोशन कंट्रोल आणि AI अल्ट्रा टच यांसारखे प्रगत AI फीचर्स यात समाविष्ट आहेत. याशिवाय, फोनमधील Antenna Array Matrix 2.0 तंत्रज्ञानामुळे 30% अधिक चांगली नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळते.

हा डिव्हाइस Snapdragon 6 Gen 4 SoC प्रोसेसरवर चालतो आणि 12GB रॅम सपोर्ट करतो. यात 6050mm² एरोस्पेस ग्रेड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे, जी फोन ओव्हरहिटिंगपासून बचाव करते. गेमिंगसाठी हा फोन 90fps BGMI सपोर्ट करतो.

कॅमेराबाबत सांगायचे झाल्यास, यात 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट सेंसर आहे. याला IP69 रेटिंग मिळाली आहे, त्यामुळे हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो.

Realme 14 5G मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यात Titan बॅटरी वापरण्यात आली आहे, जी जास्त काळ टिकणारी आहे. तसेच, हा फोन 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो, त्यामुळे बॅटरी जलद चार्ज होते.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel