Realme ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाच्या निमित्ताने खास भेट देत realme 13 Pro आणि realme 13 Pro+ स्मार्टफोन्सच्या किंमतीत 3 हजार रुपयांची कपात केली आहे. त्याचबरोबर realme 13+ 5G स्मार्टफोनच्या किंमतीत 2 हजार रुपयांची घट करण्यात आली आहे.
या किंमत कपातीनंतर रियलमी 13+ 5G हा फोन आता 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टफोनची नवीन किंमत आणि फीचर्सची माहिती खाली दिली आहे.
डिस्प्ले : रियलमी 13+ 5G फोनमध्ये 2400 × 1080 पिक्सल रिझोल्यूशन असलेली 6.67-इंचाची फुलएचडी+ सॅमसंग E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आली आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅम्पलिंग रेट 180Hz असून ब्राइटनेस 2000 निट्स आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसोबतच Rainwater Smart Touch फीचरदेखील देण्यात आले आहे. हा फोन IP65 सर्टिफाइड आहे, म्हणजेच तो पाणी आणि धुळीपासून सुरक्षित आहे.
प्रोसेसर: Realme 13+ 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300 Energy ऑक्टा-कोर प्रोसेसरवर आधारित आहे. यात 2.5GHz क्लॉक स्पीडचे चार Cortex-A78 कोर आणि 2.0GHz क्लॉक स्पीडचे चार Cortex-A55 कोर समाविष्ट आहेत. ग्राफिक्ससाठी Mali-G615 GPU दिला आहे. या फोनमध्ये 9 5G बँड्सचा सपोर्ट आहे.
मेमरी आणि स्टोरेज: रियलमी 13+ 5G फोन 8GB आणि 12GB LPDDR4X RAM पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 14GB डायनामिक RAM तंत्रज्ञान दिले आहे, ज्यामुळे 12GB फिजिकल RAMसह एकूण 26GB RAM ची क्षमता मिळते. स्टोरेजसाठी हा फोन 128GB आणि 256GB UFS 3.1 तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी रियलमी 13+ 5G स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात f/1.8 अपर्चरसह 50MP Sony LYT 600 सेन्सर आणि 2MP मोनो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी f/2.4 अपर्चरसह 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.
बॅटरी: Realme 13+ 5G फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी दिली असून ती 80W Ultra Charge तंत्रज्ञानाद्वारे अतिशय जलद चार्ज करता येते. मोठ्या बॅटरीमुळे फोनला चांगला बॅकअप मिळतो.