Poco M7 5G Launch Date Confirm: टेक कंपनी Poco ने अधिकृतरित्या घोषणा केली आहे की, ती 3 मार्च रोजी भारतात सेगमेंटमधील सर्वात वेगवान स्मार्टफोन Poco M7 5G लाँच करणार आहे. हा फोन Poco M6 ची जागा घेईल, जो डिसेंबर 2023 मध्ये ₹10,499 किंमतीत लॉन्च झाला होता.
लाँचपूर्वीच, या फोनचा लँडिंग पेज Flipkart अॅपवर लाईव्ह झाला असून, त्यामुळे या डिव्हाइसचे डिझाइन आणि मुख्य फीचर्स उघड झाले आहेत. अधिकृत लिस्टिंगमधून फोनच्या किंमतीच्या रेंजचीही पुष्टी झाली आहे. Poco ने X (Twitter) वर पोस्ट करून Poco M7 5G च्या लाँच डिटेल्सची माहिती दिली आहे. चला पाहुया, Poco M7 5G कडून काय अपेक्षा ठेवता येतील.
Poco M7 5G चे डिझाइन
Poco M7 5G मध्ये गोलाकार कॅमेरा मॉड्यूल आहे. पुढील बाजूस punch-hole डिझाइनसह flat display देण्यात आले आहे. डिव्हाइसच्या खालच्या भागात SIM slot, microphone, USB-C port, आणि speaker आहे. तसेच, यात side-facing fingerprint sensor असण्याची शक्यता आहे.
Poco M7 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि संभाव्य किंमत
Poco ने पुष्टी केली आहे की, या स्मार्टफोनची किंमत ₹10,000 च्या आत असेल, त्यामुळे हा भारतातील सर्वात स्वस्त 5G smartphone पैकी एक ठरणार आहे. Poco M7 मध्ये 6.88-inch LCD panel आहे, जो 120Hz refresh rate, 240Hz touch sampling rate, आणि 600 nits peak brightness सपोर्ट करतो.
प्रोसेसिंगसाठी, Poco M7 5G मध्ये Snapdragon 4 Gen 2 chipset देण्यात आला आहे, जो 6GB RAM आणि 6GB virtual RAM सह येईल. हा स्मार्टफोन Redmi 14C 5G चा rebranded version असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, यात 8MP selfie camera, मागील बाजूस 50MP primary camera, आणि 18W fast charging सपोर्टसह 5,160mAh battery असण्याची अपेक्षा आहे.