Poco F7 Ultra लवकरच भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्याने या अल्ट्रा व्हेरिएंटच्या भारतातील आगमनाची पुष्टी दिली आहे. भारतीय व्हेरिएंटमध्ये देखील जागतिक व्हेरिएंटप्रमाणेच (Global Variant) स्पेसिफिकेशन्स असण्याची शक्यता आहे.
Poco F7 Ultra ला मार्च महिन्यात Poco F7 Pro सोबत काही निवडक जागतिक बाजारांमध्ये सादर करण्यात आले होते, मात्र त्याचा भारतात लॉन्च होण्याचा सध्या तरी काही प्लॅन नाही. मात्र अलीकडे BIS (Bureau of Indian Standards) च्या संकेतस्थळावर बेस Poco F7 मॉडेल दिसून आल्याने या फोनचा भारतातील लाँच लवकरच होण्याचे संकेत मिळाले आहेत.
भारतात लाँच होणार Poco F7 Ultra
Poco India चे प्रमुख हिमांशु टंडन यांनी X पोस्टद्वारे Poco F7 Ultra च्या भारतातील लाँचबाबत माहिती दिली आहे. त्यांनी “Knock Knock!!” असे कॅप्शन देत Poco F7 Ultra हँडसेटसह स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते फोनच्या प्रमोशनल बॅनरसमोर उभे आहेत. त्या फोटोवर “UltraVision सगळं पाहतं” असे लिहिलेले आहे.
भारतीय व्हेरिएंटमध्ये त्याचे ग्लोबल व्हेरिएंटसारखे फीचर्स (Features) असण्याची अपेक्षा आहे. यात Snapdragon 8 Elite Chipset, 120W Wired आणि 50W Wireless Charging सपोर्टसह 5300mAh क्षमतेची बॅटरी, आणि 6.67-इंच 120Hz WQHD+ AMOLED Display दिली जाऊ शकते. हा फोन Android 15 बेस्ड HyperOS 2 वर काम करतो. यात 32MP Selfie Camera आणि 50MP Triple Rear Camera Setup आहे.
अमेरिकेमध्ये इतकी आहे Ultra व्हेरिएंटची किंमत
अमेरिकेत Poco F7 Ultra ची किंमत 12GB+256GB आणि 16GB+512GB व्हेरिएंटसाठी अनुक्रमे $599 (अंदाजे ₹51,000) आणि $649 (अंदाजे ₹55,000) इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन Black आणि Yellow रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे.
धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या फोनला IP68 Rating मिळाली आहे. तसेच, सेफ्टीसाठी यामध्ये Ultrasonic In-Display Fingerprint Sensor दिला गेला आहे.
Poco F7 ची वैशिष्ट्ये (संभाव्य)
Ultra व्हेरिएंटसोबत, Poco भारतात बेस Poco F7 व्हेरिएंट देखील सादर करू शकतो. या फोनला अलीकडेच भारतीय मानक ब्यूरो (BIS) च्या संकेतस्थळावर Model Number 25053PC47I सह पाहण्यात आले होते, ज्यामुळे याचा भारतातील लाँच लवकरच होण्याची शक्यता आहे.
या फोनमध्ये Snapdragon 8s Gen 4 Chipset, 1.5K Display, आणि मेटल मिडल फ्रेमसह ग्लास बॉडी मिळू शकते. यात 90W Wired Charging सपोर्टसह 7550mAh Battery दिली जाऊ शकते.














