स्मार्टफोन कंपन्या सध्या सर्वाधिक लक्ष स्मार्टफोन्सच्या बॅटरीवर केंद्रित करत आहेत. आता माहिती समोर आली आहे की चीनच्या स्मार्टफोन निर्माता OnePlus आणि Oppo त्यांच्या आगामी फोन्समध्ये 8000mAh ची मोठी बॅटरी सादर करू शकतात.
विश्वासार्ह गॅझेट टिपस्टर Digital Chat Station यांच्या माहितीनुसार, या दमदार बॅटरीची चाचणी कंपन्यांनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे OnePlus गेल्या वर्षीपासून आपल्या नवीन फोन्ससाठी 7000mAh बॅटरीवर काम करत आहे.
चीनी टिपस्टरच्या माहितीनुसार, Oppo आणि OnePlus एक शक्तिशाली नवीन बॅटरी विकसित करत आहेत, जी 8000mAh क्षमतेची असून 80W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी 5000mAh बॅटरीच्या तुलनेत 60% पर्यंत मोठी आहे. Android Authority च्या अहवालानुसार, OnePlus आणि Oppo ही बॅटरी तयार करण्यासाठी 15% हाय-सिलिकॉन कंटेंटचा वापर करत आहेत.
यामुळे भविष्यात OnePlus आणि Oppo च्या मिड-रेंज आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये बॅटरी परफॉर्मन्समध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येऊ शकते. मात्र, टिपस्टरने 8000mAh बॅटरी तंत्रज्ञानासंबंधी इतर कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. गेल्या वर्षी समोर आलेल्या एका अहवालानुसार, OnePlus 7000mAh बॅटरीवर काम करत असल्याचे संकेत मिळाले होते.
Oppo ची उपकंपनी Realme देखील गेल्या वर्षीपासून 80W फास्ट चार्जिंगसह 8000mAh बॅटरी विकसित करत आहे. अंदाजानुसार, 8000mAh बॅटरी नॉर्मल युसेजमध्ये 3 ते 4 दिवस टिकू शकते. उदाहरणार्थ, 6000mAh बॅटरीबाबत कंपनीचा दावा आहे की ती सिंगल चार्जवर 2-3 दिवस चालते.