OnePlus ने बराच काळ सुरू असलेल्या अफवा आणि लीकनंतर अखेर OnePlus 13 च्या लॉन्च डेटची घोषणा केली आहे. चीनमध्ये 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता (स्थानिक वेळेनुसार) होणाऱ्या लॉन्च इव्हेंटमध्ये OnePlus 13 सादर केला जाणार आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट मिळणार आहे. चला, OnePlus 13 बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
OnePlus 13 Design
OnePlus 13 तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये सादर केला जाईल. व्हाइट डॉन वर्जनमध्ये लेटेस्ट सिल्क ग्लास तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, जे स्लीक आणि एलिगंट लुक देते. ब्लू मोमेंट हा इंडस्ट्रीतील पहिला प्रोडक्ट आहे जो बेबीस्किन टेक्सचर देते, ज्यामुळे फोन हातात घेतल्यावर स्किनसारखा मऊ फील मिळतो. ओब्सिडियन सीक्रेट व्हेरिएंट एबोनी वूड ग्रेन ग्लास फिनिशमध्ये येतो, जो नैसर्गिक लाकडी टेक्श्चर आणि रिफाइंड लुक देतो.
डिझाइनच्या दृष्टीने OnePlus 13 च्या फ्रंटला मायक्रो-क्वाड-कर्व्ड डिस्प्ले आणि बॅक पॅनलवर सर्क्युलर कॅमेरा मॉड्यूल आहे. हा कॅमेरा मॉड्यूल मागील मॉडेल्सप्रमाणे फ्रेममध्ये विलीन होत नाही. यामध्ये तीन कॅमेरे आणि एक LED फ्लॅश युनिट आहेत, जे रेकटॅंग्युलर पॅटर्नमध्ये सिमेट्रिकली ठेवले आहेत. कॅमेरा मॉड्यूलच्या भोवती असलेली मेटल रिंग त्याला एक एलिगंट लुक देते आणि बॅक पॅनलपासून वेगळे करते.
कॅमेरा मॉड्यूलवरून फोनच्या कोपऱ्यांपर्यंत जाणारी क्षितिजरेषा आहे, ज्यावर “H” (हॅसलब्लॅड) लोगो आहे. मॉड्यूलच्या खाली OnePlus चा लोगो आहे, जो एक साधा आणि क्लीन लुक देतो. फोनचे मेटलिक कोपरे प्रीमियम फील देतात. OnePlus ने या स्मार्टफोनच्या डिझाइनसाठी काही टीझरही जारी केले आहेत. तांत्रिक वैशिष्ट्यांबाबत मात्र अद्याप सर्व माहिती उपलब्ध नाही.
OnePlus 13 Specification
लीक्सनुसार, OnePlus 13 मध्ये 6.82 इंच BOE डिस्प्ले असेल, ज्याचा 2K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर असणार आहे. स्टोरेजबाबत सांगायचे तर यात 24GB LPDDR5x RAM आणि 1TB UFS 4.0 इनबिल्ट स्टोरेज दिले जाईल.
6,000mAh क्षमतेची बॅटरी असलेला हा स्मार्टफोन 100W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करेल.
कॅमेरा सेटअपमध्ये, याच्या रियरला 50MP LYT-808 प्राइमरी सेंसर असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल. हा स्मार्टफोन Android 15 आधारित ColorOS 15 वर कार्य करेल. यामध्ये 0916T वायब्रेशन मोटर आणि IP69 रेट चेसिस उपलब्ध असेल.