iQOO च्या नवीन फोनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. कंपनीने आपले दोन नवीन फोन, iQOO Z9s Pro 5G आणि iQOO Z9s 5G, लॉन्च केले आहेत. हे फोन Qualcomm आणि MediaTek च्या प्रोसेसरसह सुसज्ज आहेत. दोन्ही फोन Android 14 वर चालतात. iQOO Z9s Pro 5G ची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे, तर iQOO Z9s 5G ची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये आहे.
iQOO Z9s Pro 5G Feature
फीचर्सच्या बाबतीत, iQOO Z9s Pro 5G आणि iQOO Z9s 5G दोन्हीमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 387ppi पिक्सल डेंसिटीसह 6.77-इंच फुल-HD+ (1,080×2,392 पिक्सल) AMOLED स्क्रीन आहे. दोन्ही फोन Android 14 बेस्ड FunTouch OS 14 वर काम करतात. iQOO Z9s Pro 5G Snapdragon 7 Gen 3 चिपसेटने सुसज्ज आहे, तर iQOO Z9s 5G MediaTek Dimensity 7300 SoC वर कार्यरत आहे. दोन्ही फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR4X RAM आहे.
iQOO Z9s Pro 5G Camera
कॅमेऱ्याच्या दृष्टीने, iQOO ने दोन्ही स्मार्टफोनमध्ये Sony IMX882 सेन्सर आणि f/1.7 अपर्चरसह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. बेस मॉडेलमध्ये 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे, तर प्रो मॉडेलमध्ये f/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी, iQOO Z9s Pro 5G आणि iQOO Z9s 5G दोन्हीमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. दोन्ही फोनमध्ये 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज दिले गेले आहे.
iQOO Z9s Pro 5G Battery
पॉवरसाठी, दोन्ही फोनमध्ये 5,500mAh ची बॅटरी दिली जाते. मात्र, प्रो मॉडेलला 80W फ्लॅशचार्ज सपोर्ट आणि बेस मॉडेलला 44W चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS आणि USB Type-C पोर्टचा समावेश आहे.
iQOO Z9s Pro 5G Price
भारतामध्ये iQOO Z9s Pro 5G ची किंमत 24,999 रुपये आहे, ज्यात 8GB RAM आणि 128GB स्टोरेजचा समावेश आहे. 8GB+256GB आणि 12GB+256GB RAM आणि स्टोरेज वेरिएंटची किंमत अनुक्रमे 26,999 आणि 28,999 रुपये आहे. या फोनची विक्री 23 ऑगस्टपासून सुरू होईल.
iQOO Z9s 5G Price
iQOO Z9s 5G ची किंमत 8GB+128GB RAM आणि स्टोरेज वेरिएंटसाठी 19,999 रुपये आहे. 8GB+256GB वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे आणि 12GB+256GB वेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे.