जर तुम्ही कमी किमतीत दीर्घकालीन बॅटरी लाइफ (Battery Life) असलेले इयरबड्स (Earbuds) शोधत असाल, तर numBer ब्रँडचे नवीन ऑडिओ डिव्हाइस (Audio Device) तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतात. कंपनीने भारतात numBer Navo Buds N1 हे नवीन इयरबड्स लाँच केले आहेत. कंपनीचा दावा आहे की हे इयरबड्स एका फुल चार्जवर केससह एकूण 100 तासांपर्यंत कार्य करू शकतात.
याआधी फेब्रुवारी 2025 मध्ये Navo Buds X1 लाँच करण्यात आले होते आणि दोन महिन्यांपेक्षा कमी वेळात त्याच्या 1 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली होती. आता या नवीन बड्सची किंमत आणि वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत, ते पाहूया…
Navo Buds N1 मध्ये मेटॅलिक फिनिश (Metallic Finish) आणि दीर्घकाळ घालण्यासाठी एर्गोनोमिक डिझाइन (Ergonomic Design) आहे. हे इयरबड्स ब्लूटूथ 5.4 (Bluetooth 5.4) कनेक्टिव्हिटीसह येतात आणि ड्युअल डिव्हाइस पेरिंग (Dual Device Pairing) ला सपोर्ट करतात.
गेमिंगसाठी यामध्ये 35ms लो लेटंसी मोड (Low Latency Mode) देखील देण्यात आला आहे. दमदार आवाजासाठी, यामध्ये 13mm टायटॅनियम ड्रायव्हर्स (Titanium Drivers) दिले असून ते हाय बास (High Bass) साठी खास ट्यून केलेले आहेत.
फुल चार्जमध्ये मिळणार 100 तासांची Battery Life
स्वच्छ आणि स्पष्ट आवाजासाठी बड्समध्ये Quad MEMS Microphone System आणि ClearVoice Environmental Noise Cancellation (ENC) यांसारखी प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की 50% वॉल्यूमवर केससह एकूण 100 तासांचा प्लेटाइम (Playback Time) मिळतो.
यामध्ये फास्ट चार्जिंग (Fast Charging) सपोर्ट देखील दिला गेला आहे. केवळ 15 मिनिटांच्या क्विक चार्जिंगमध्ये (Quick Charging) हे इयरबड्स 150 मिनिटांपर्यंत कार्य करतात. चार्जिंगसाठी यामध्ये USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.
इतर वैशिष्ट्यांमध्ये टच कंट्रोल, वन-बटण रिसेट फंक्शन (One-Button Reset Function), व्हॉईस असिस्टंट कम्पॅटिबिलिटी (Voice Assistant Compatibility) आणि कस्टमायजेबल EQ मोड (Customizable EQ Mode) यांचा समावेश आहे. याशिवाय हे इयरबड्स IPX5 वॉटर रेसिस्टंट (IPX5 Water Resistance) रेटिंगसह येतात, ज्यामुळे धूळ, पाणी आणि घामापासून सुरक्षित राहतात.
किंमत आणि उपलब्धता
Navo Buds N1 ची सध्याची किंमत फक्त ₹899 इतकी असून ही इंट्रोडक्टरी प्राइस (Introductory Price) आहे. ग्राहक हे Flipkart, Amazon आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइट numberfc.com वरून खरेदी करू शकतात. हे इयरबड्स पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये सादर करण्यात आले आहेत – Beast Green, Bold Black, Choco Brown, Tangy Beige आणि Genzy Blue. कंपनी या उत्पादनावर 1 वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.