Motorola लवकरच तीन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी Moto G56, Moto G86 आणि Motorola Edge 60 Series सादर करण्याची योजना आखत आहे. Motorola Edge 50 भारतात ऑगस्ट 2024 मध्ये लॉन्च झाला होता, आणि त्याचा उत्तराधिकारी Edge 60 Series लवकरच सादर केला जाऊ शकतो.
या सीरीजमध्ये Edge 60 Pro आणि Edge 60 Fusion हे दोन मॉडेल्स असण्याची शक्यता आहे, जे Edge 50 Pro आणि Edge 50 Fusion चे अपग्रेडेड व्हर्जन असतील. अधिकृत लॉन्चपूर्वीच Moto G56, Moto G86 आणि Edge 60 Series बाबत किंमत, कलर आणि स्टोरेज डिटेल्स लीक झाले आहेत.
Motorola Edge 60 Series, Moto G56, Moto G86 किंमत (लीक)
✅ Motorola Edge 60 Fusion: Edge 60 Fusion 8GB RAM + 256GB स्टोरेज कॉन्फिगरेशनसह उपलब्ध होईल. काही निवडक बाजारांमध्ये या फोनची किंमत EUR 350 (अंदाजे ₹33,100) असू शकते. हा फोन ब्लू आणि ग्रे रंगसंगतीत येण्याची शक्यता आहे.
✅ Motorola Edge 60: स्टँडर्ड Edge 60 ग्रीन आणि सी ब्लू शेड्समध्ये येण्याची अफवा आहे. या फोनच्या 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत EUR 380 (सुमारे ₹36,000) असू शकते. रिपोर्टनुसार, Edge 60 Pro ची किंमत EUR 600 (सुमारे ₹56,800) असणार आहे. हा फोन ब्लू, ग्रीन आणि ग्रेप (पर्पल) कलर ऑप्शनमध्ये येण्याची शक्यता आहे. Motorola Edge 60 Pro मध्ये 5,100mAh बॅटरी आणि 68W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
✅ Moto G56: लीक माहितीनुसार, Moto G56 हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि डिल (लाइट ग्रीन) रंगांमध्ये सादर केला जाऊ शकतो. 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत EUR 250 (सुमारे ₹23,700) असू शकते.
✅ Moto G86: Moto G86 चा 8GB + 256GB व्हेरिएंट सुमारे EUR 330 (अंदाजे ₹31,200) मध्ये लॉन्च होऊ शकतो. हा स्मार्टफोन गोल्डन, कॉस्मिक (लाइट पर्पल), रेड आणि स्पेलबाउंड (ब्लू) कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असू शकतो.