Lenovo ने जगातील पहिल्या अशा लॅपटॉपचे अनावरण केले आहे, ज्यामध्ये अंडर-डिस्प्ले कॅमेरा दिला आहे. या नवीन लॅपटॉपचे नाव Lenovo Yoga Air X AI Yuanqi Edition असून, तो चीनच्या बाजारात सादर करण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा OLED टच डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 4K रिझोल्यूशन सपोर्ट करतो. याला 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. यामध्ये Intel Core Ultra 7 258V प्रोसेसर देण्यात आला आहे. 17 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक क्षमता असलेल्या या लॅपटॉपमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
Lenovo Yoga Air X AI Yuanqi Edition किंमत
Lenovo Yoga Air X AI Yuanqi Edition ची किंमत 14,999 युआन (सुमारे ₹1,80,000) ठेवण्यात आली आहे. या किमतीत 32GB RAM आणि 1TB स्टोरेज वेरिएंट उपलब्ध आहे.
Lenovo Yoga Air X AI Yuanqi Edition स्पेसिफिकेशन्स
हा लॅपटॉप 14-इंच OLED टच डिस्प्ले सह येतो, जो 4K रिझोल्यूशन प्रदान करतो. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट दिला असून, तो DisplayHDR True Black 600 सर्टिफिकेशन प्राप्त आहे. तसेच, Dolby Vision सपोर्ट, 100% sRGB, P3 आणि Adobe RGB कलर गॅमट सपोर्ट देखील यात मिळतो. TÜV Rheinland सर्टिफिकेशन असल्याने तो डोळ्यांचे संरक्षण देखील करतो.
यामध्ये Intel Core Ultra 7 258V चिपसेट, 32GB LPDDR5X RAM, आणि 1TB PCIe Gen 4 SSD स्टोरेज देण्यात आले आहे. लॅपटॉप अल्ट्रा स्लिम डिझाइन मध्ये येतो आणि त्याचे वजन फक्त 1.23 किलोग्रॅम आहे. याची जाडी 14.55mm इतकी आहे. यामध्ये 75Wh बॅटरी देण्यात आली आहे, जी 17 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देऊ शकते. तसेच, यात 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
लॅपटॉपचा मुख्य आकर्षण 32MP अंडर-डिस्प्ले वेबकॅम आहे, जो फुल-स्क्रीन व्हिडिओ कॉलिंग एक्सपीरियन्स देतो. यामध्ये 10W क्वाड-स्पीकर सिस्टम, Dolby Atmos सपोर्ट, Thunderbolt 4 चे दोन पोर्ट्स, Wi-Fi 7 सपोर्ट, आणि फिंगरप्रिंट सिक्युरिटी देण्यात आली आहे.