जर तुम्ही कमी बजेटमध्ये नवीन LED TV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही अप्रतिम पर्याय सुचवत आहोत. या यादीतील टीव्हींची किंमत 8500 रुपयांपेक्षा कमी आहे. यामधील सर्वात स्वस्त टीव्ही केवळ 4999 रुपयांना उपलब्ध आहे.
हे टीव्ही तुम्ही Amazon India वरून खरेदी करू शकता. फीचर्सच्या बाबतीत बोलायचे झाले, तर या टीव्हीमध्ये तुम्हाला उत्कृष्ट डिस्प्ले आणि साउंड अनुभवायला मिळेल. याशिवाय, हे टीव्ही किफायतशीर दरात जबरदस्त फ्रेमलेस डिझाइनसह उपलब्ध आहेत. चला, या टीव्हींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
VW 60 cm (24 inches) Premium Series HD Ready LED TV VW24A (Black)
Amazon India वर हा टीव्ही फक्त ₹4,999 मध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीमध्ये तुम्हाला अनेक उत्कृष्ट फीचर्स मिळतील. फ्रेमलेस डिझाइन असलेला हा टीव्ही 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. दमदार आवाजासाठी यात 20 वॉटचे ऑडिओ आउटपुट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीने एक HDMI पोर्ट दिला आहे. हा टीव्ही एक वर्षांच्या वॉरंटीसह येतो.
Kodak 80 cm (32 inches) Special Edition Series HD Ready Smart LED TV 32SE5001BL (Black)
Kodak चा हा एलईडी टीव्ही Amazon वर फक्त ₹8,499 मध्ये मिळतो. फ्रेमलेस डिझाइन असलेल्या या टीव्हीमध्ये 400 निट्स ब्राइटनेस असलेला डिस्प्ले आहे. यामध्ये 512MB रॅम आणि 4GB इंटरनल स्टोरेज आहे. प्रोसेसरसाठी यात MLogic Quad Core Chipset देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या एचडी रेडी डिस्प्लेमध्ये 3 HDMI पोर्ट्स आणि 2 USB पोर्ट्स उपलब्ध आहेत.
Acer 80 cm (32 inches) Advanced N Series Standard LED TV AR32NSV53HDFL (Black)
Acer चा हा एलईडी टीव्ही ₹7,999 मध्ये उपलब्ध आहे. प्रीमियम फ्रेमलेस डिझाइन असलेल्या या टीव्हीमध्ये 1366 x 768 पिक्सेल्स रिझोल्यूशन असलेला एचडी डिस्प्ले आहे. दमदार साउंडसाठी यात 24 वॉटचे Hi-Fi Surround Sound स्पीकर्स दिले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI पोर्ट्स आणि 2 USB पोर्ट्स आहेत. हा टीव्ही एक वर्षांच्या वॉरंटीसह येतो.