Lava Blaze 3 5G लॉन्च: लावा कंपनीने भारतात आपला नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Lava Blaze 3 5G हा कंपनीने गेल्या वर्षी (2023) लॉन्च केलेल्या Blaze 2 5G चा अपग्रेडेड वेरियंट आहे. या नवीन लावा स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच 90 हर्ट्झ LCD स्क्रीन, 6GB पर्यंत वर्चुअल रॅम, 50MP कॅमेरा आणि डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर असे फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन Lava स्मार्टफोनमध्ये (Lava Smartphone) काय खास आहे? किंमत आणि फीचर्सची सर्व माहिती जाणून घ्या…
Lava Blaze 3 5G ची किंमत
Lava Blaze 3 5G स्मार्टफोनच्या 6 GB रॅम व 128 GB स्टोरेज वेरियंटची किंमत 11,499 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु बँक ऑफर्ससह फोनची किंमत 9,999 रुपये राहते. हा हँडसेट ग्लास ब्लू आणि ग्लास गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध आहे. 18 सप्टेंबरपासून लावा ऑनलाईन स्टोअर आणि Amazon India वर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होईल.
लावा Blaze 3 5G वापरकर्त्यांसाठी कंपनीकडून मोफत सर्व्हिस देखील ऑफर केली जात आहे.
Lava Blaze 3 5G चे स्पेसिफिकेशन्स
Lava Blaze 3 5G स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच (1600 × 720 पिक्सेल) HD+ LCD कर्व्ड स्क्रीन देण्यात आली आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6300 (डायमेन्सिटी 6300) 6nm प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी Arm Mali-G57 MC2 आहे.
Lava Blaze 3 5G मध्ये 6 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेज मिळते. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 TB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन Android 14 सह येतो आणि ड्युअल सिम सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल सेकंडरी AI कॅमेरा असलेला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळतो. सुरक्षिततेसाठी या हँडसेटमध्ये साइड-फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
Lava Blaze 3 5G मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 18W चार्जिंग सपोर्ट करते. हँडसेटमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक, FM रेडिओ आणि स्टीरिओ स्पीकर्स आहेत. या डिव्हाइसचे डिमेन्शन 164.3 × 76.24 × 8.6 मिमी असून वजन 201 ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, ब्लूटूथ 5.1, GPS, आणि USB Type-C फीचर्स आहेत.