जानेवारी 2026 मध्ये स्मार्टफोन खरेदी करणार असाल? तर 5 दमदार स्मार्टफोन बद्दल जाणून घ्या

नव्या वर्षात स्मार्टफोन बाजारात मोठी उलथापालथ. Realme, Redmi, Oppo आणि Poco कडून नवे फोन; फीचर्स आणि संभाव्य किंमती जाणून घ्या.

Mahesh Bhosale
January 2026 Smartphone Launches
January 2026 Smartphone Launches

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस थांबणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. जानेवारी 2026 मध्ये मिड-रेंज आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये अनेक नवे स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहेत. Realme, Redmi, Oppo आणि Poco यांसारख्या ब्रँड्सकडून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नवी मॉडेल्स सादर केली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

Realme 16 Pro मालिका

Realme जानेवारीच्या सुरुवातीला आपली Realme 16 Pro मालिका सादर करू शकते. या मालिकेत Realme 16 Pro आणि Realme 16 Pro Plus अशी दोन मॉडेल्स असण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि नवे डिझाइन पाहायला मिळू शकते. ही मालिका 6 जानेवारी 2026 रोजी सादर होण्याची शक्यता असून, त्यानंतर हे फोन Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात.

Redmi Note 15 5G

Redmi देखील जानेवारीच्या सुरुवातीला आपला नवा स्मार्टफोन Redmi Note 15 5G सादर करू शकते. या डिव्हाइसमध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा देण्यात येण्याची शक्यता असून, Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसरचा वापर करण्यात येऊ शकतो. कंपनीकडून अद्याप अधिकृत किंमत जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र हा फोन 20,000 ते 25,000 रुपये या किंमत श्रेणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा स्मार्टफोनही 6 जानेवारी रोजी सादर होऊ शकतो.

- Advertisement -

Oppo Reno 15 मालिका

Oppo जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपली Reno 15 मालिका सादर करण्याची शक्यता आहे. या मालिकेत Oppo Reno 15, Oppo Reno 15 Pro आणि Oppo Reno 15 Mini अशी मॉडेल्स असू शकतात. या फोनचे कॅमेरा फीचर्स हे त्याचे प्रमुख आकर्षण असतील, असे संकेत मिळत आहेत. मात्र, कंपनीकडून अद्याप अधिकृत लॉन्च तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

POCO M8

बजेट सेगमेंटमध्ये Poco कडून Poco M8 हा नवा स्मार्टफोन सादर केला जाण्याची शक्यता आहे. या फोनची Flipkart वरील मायक्रोसाइट आधीच लाईव्ह झाली असून, लवकरच लॉन्च होण्याचे संकेत मिळतात. उपलब्ध माहितीनुसार, या डिव्हाइसमध्ये Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर देण्यात येऊ शकतो. जानेवारी महिन्यात आणखी काही स्मार्टफोन बाजारात येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

TAGGED:
महेश भोसले हे MarathiGold.com साठी गॅजेट्स आणि टेक्नॉलॉजी कॅटेगरीमध्ये लेखन करणारे कंटेंट लेखक आहेत. ते स्मार्टफोन, अ‍ॅप्स आणि नव्या टेक ट्रेंड्सबाबत अचूक व उपयुक्त माहिती सादर करतात.