मोठ्या बॅटरीसह येणारे स्मार्टफोन्स बाजारात वेगाने लाँच होत आहेत. 5,500mAh आणि 6,000mAh बॅटरी असलेले फोन्स आता सामान्य झाले आहेत, पण जर एखादा फोन तब्बल 10,000mAh बॅटरी (battery) सह आला तर? सस्त्या स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या itel या टेक ब्रँडने Power 70 हा स्मार्टफोन सादर केला आहे, जो प्रचंड मोठ्या बॅटरीसह येतो. itel Power 70 ची किंमत $85 असून, भारतीय चलनानुसार सुमारे ₹7,450 आहे.
itel Power 70 ची बॅटरी
itel Power 70 या फोनची सर्वात मोठी ताकद म्हणजे यामधील 6,000mAh बॅटरी (battery) होय. विशेष म्हणजे कंपनी फोनसोबत एक स्पेशल कवर देते, ज्यामध्ये 4,000mAh बॅटरी (battery) बसवलेली आहे. हा केस USB पोर्ट द्वारा फोनशी कनेक्ट केला जातो, त्यामुळे एकूण 10,000mAh बॅटरी (battery) क्षमता मिळते. तसेच, हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंग (fast charging) ला सपोर्ट करतो.
itel Power 70 चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: itel Power 70 मध्ये 6.67-इंच HD+ LCD स्क्रीन (display) देण्यात आली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेट (refresh rate) आणि 700 nits ब्राइटनेस (brightness) ला सपोर्ट करते. हा फोन ओल्या आणि तेलकट हातानेही सहज चालवता येतो, असे कंपनीने सांगितले आहे.
प्रोसेसर: हा स्वस्त फोन MediaTek Helio G50 Ultimate (processor) चिपसेटसह सादर करण्यात आला आहे, जो 2.2GHz क्लॉक स्पीड (clock speed) वर काम करतो. ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन Android OS वर कार्यरत आहे.
मेमरी: itel Power 70 मध्ये 4GB RAM, 6GB RAM आणि 8GB RAM असे तीन व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 4GB RAM + 128GB स्टोरेज, तर टॉप व्हेरिएंटमध्ये 8GB RAM + 256GB स्टोरेज (storage) सपोर्ट आहे.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी या बजेट स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 13MP कॅमेरा (camera) फ्लॅशसह दिला आहे. तर 8MP फ्रंट कॅमेरा (selfie camera) सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे.
इतर फीचर्स: itel Power 70 मध्ये Dual Nano SIM (SIM support) सपोर्ट आहे. याशिवाय 3.5mm हेडफोन जॅक (headphone jack), लाउड स्पीकर (loudspeaker) आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर (fingerprint sensor) देखील आहे.