iQOO Z9 Turbo+ Launched: iQOO ने चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नवीन iQOO Z9 Turbo+ मध्ये MediaTek Dimensity 9300+ चिपसेट, 16GB पर्यंत RAM आणि 6400mAh मोठी बॅटरी यासारखी फीचर्स आहेत.
या स्मार्टफोनमध्ये 50MP ड्युअल रिअर कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर यांसारखी फीचर्स दिली आहेत. याआधी Z-Series मध्ये iQoo Z9 Turbo, iQoo Z9 आणि iQoo Z9x हे स्मार्टफोनदेखील लॉन्च झाले होते. चला जाणून घेऊ या नवीन iQOO स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स…
iQOO Z9 Turbo+ Price
iQOO Z9 Turbo+ च्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 2,299 युआन (सुमारे ₹27,300) पासून सुरू होते. हा स्मार्टफोन 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. हा फोन Midnight Black, Moonlight Shadow Titanium आणि Starlight White अशा तीन रंगांमध्ये येतो.
iQOO Z9 Turbo+ Specifications
iQOO Z9 Turbo+ स्मार्टफोन ड्युअल-सिम सपोर्ट करतो. यामध्ये 6.78 इंच 1.5K (1,260 x 2,800 पिक्सेल) AMOLED स्क्रीन आहे, जी 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करते. या फोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसर आहे. गेमिंगसाठी स्वतंत्र Q1 चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी Arm Immortalis-G720 दिला आहे. फोनमध्ये 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोनमध्ये Android 14 बेस्ड OriginOS 4 ऑपरेटिंग सिस्टम आहे.
iQOO Z9 Turbo+ Camera
फोटोग्राफीसाठी iQOO Z9 Turbo+ मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा दिला आहे. यात F/1.79 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल Sony LYT-600 प्रायमरी कॅमेरा आणि F/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. सिक्युरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. फोनचे माप 163.72×75.88×7.98mm असून वजन 196 ग्राम आहे.
iQOO Z9 Turbo+ Battery
iQOO च्या या फोनला 6400mAh मोठी बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC आणि USB Type-C पोर्ट दिला आहे.