iQOO ने गेल्या आठवड्यात भारतात सर्वात मोठी बॅटरी असलेला iQOO Z10 5G हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा प्रीमियम फिचर्स असलेला स्मार्टफोन आज म्हणजेच 16 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
Amazon या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर iQOO Z10 5G ची पहिली सेल सुरू झाली असून आकर्षक ऑफर्ससह हा फोन खरेदी करता येणार आहे. भारतात आजवर कधीही न आलेली 7300mAh क्षमतेची ग्रँड बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. आता पाहूया या फोनच्या सेल डिटेल्स आणि वैशिष्ट्यांबाबत सविस्तर माहिती.
iQOO Z10 5G ची भारतातील किंमत
हा फोन तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत ₹21,999 आहे. 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलसाठी किंमत ₹23,999, तर टॉप व्हेरिएंट 12GB RAM + 256GB साठी किंमत ₹25,999 ठेवण्यात आली आहे.
iQOO Z10 5G च्या पहिल्या सेलमध्ये मिळत आहेत भन्नाट ऑफर्स
या फोनच्या पहिल्याच सेलमध्ये ₹2,000 चा इंस्टंट बँक डिस्काउंट दिला जात आहे. SBI आणि ICICI बँक कार्डधारकांना हाच डिस्काउंट मिळणार आहे. यासोबतच, जुना फोन एक्सचेंज केल्यास ₹2,000 चा अतिरिक्त सूट मिळेल. शिवाय, हा स्मार्टफोन 6 महिन्यांच्या EMI प्लॅनवर खरेदी करता येतो.
वरील सर्व ऑफर्सचा लाभ घेतल्यास ग्राहकांना iQOO Z10 5G फक्त ₹19,999 मध्ये मिळू शकतो. हा फोन दोन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे – Glacier Silver आणि Stellar Black.
iQOO Z10 5G चे वैशिष्ट्यपूर्ण फिचर्स
iQOO Z10 5G मध्ये 6.77 इंचाचा Full HD AMOLED डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. या फोनला MIL-STD-810H सर्टिफिकेशन मिळाले आहे, ज्याचा अर्थ हा फोन मिलिटरी ग्रेड टिकाऊपणा देतो. याशिवाय, फोन पाणी व धूळपासून संरक्षण करण्यासाठी IP65 सर्टिफाइड आहे.
या डिव्हाइसला Qualcomm Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर दिला आहे. तो Android 15 वर आधारित Funtouch OS 15 वर चालतो. सर्वात मोठा आकर्षण म्हणजे या फोनमध्ये देण्यात आलेली 7300mAh क्षमतेची बॅटरी जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेऱ्याच्या बाबतीत, फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आहे ज्यात OIS (Optical Image Stabilization) आणि f/1.8 अपर्चर दिले आहे. त्यासोबतच, 2MP डेप्थ सेन्सर (f/2.4 अपर्चर) आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.















