iQOO लवकरच आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. आम्ही iQOO 15 Pro बद्दल बोलत आहोत. रिपोर्ट्सनुसार, कंपनी या वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये हा नवीन फ्लॅगशिप डिव्हाइस सादर करणार आहे.
असा अंदाज आहे की, iQOO आपल्या अपकमिंग सीरिजमध्ये Q4 2025 दरम्यान Snapdragon 8 Elite 2 चिपसेटसह स्मार्टफोन लाँच करेल. या सीरिजमध्ये स्टँडर्ड आणि प्रो या दोन्ही व्हेरियंट्सचा समावेश असेल. रिपोर्टनुसार, Pro व्हेरियंटमध्ये 2K रिझोल्यूशन असलेला फ्लॅट OLED डिस्प्ले आणि 7000mAh बॅटरी मिळेल.
iQOO 15 Pro बद्दल मोठा खुलासा!
गमतीशीर गोष्ट म्हणजे, काही अफवांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, iQOO आपल्या पुढील फ्लॅगशिप डिव्हाइसचे नाव iQOO 14 न ठेवता iQOO 15 ठेवणार आहे. कारण काही आशियाई संस्कृतींमध्ये क्रमांक 4 ला अशुभ मानले जाते. ही शक्यता आणखी बळकट झाली आहे कारण टिपस्टर स्मार्ट पिकाचू यांच्या अलीकडील लीकनुसार, हा डिव्हाइस iQOO 14 नसून iQOO 15 असल्याचे स्पष्ट झाले आहे.
iQOO 15 Pro संभाव्य स्पेसिफिकेशन्स (लीकनुसार)
टिपस्टरच्या माहितीनुसार, iQOO 15 मध्ये 2K रिझोल्यूशन असलेला फ्लॅट OLED डिस्प्ले, आय-प्रोटेक्शन फिचर आणि अल्ट्रासोनिक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर असणार आहे. यामध्ये 7000mAh ची दमदार बॅटरी आणि पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite 2 चिपसेटसह सादर केला जाईल, जो ऑक्टोबर 2025 मध्ये लाँच केला जाणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही लीक मुख्यतः iQOO 15 Pro संदर्भात असल्याचे मानले जात आहे. कारण यापूर्वी टिपस्टर Experience More यांनी खुलासा केला होता की, स्टँडर्ड iQOO 15 व्हेरियंटमध्ये पेरिस्कोप कॅमेरा नसेल, तर Pro व्हेरियंटमध्ये हा फीचर असू शकतो. त्यामुळे iQOO चाहत्यांसाठी हा फ्लॅगशिप स्मार्टफोन खूपच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.