जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर HP चे नवीन मॉडेल्स तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात. कंपनीने भारतीय बाजारात EliteBook, ProBook आणि OmniBook सिरीजचे नवीन व्हर्जन लाँच केले आहेत.
HP EliteBook आणि ProBook लाइनअप खास एंटरप्राइझ (Enterprise) आणि रिटेल (Retail) ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. यामध्ये HP EliteBook 8 (G1i, G1a), HP EliteBook 6 (G1q, G1a) आणि HP ProBook 4 G1q हे मॉडेल्स समाविष्ट आहेत.
दरम्यान, क्रिएटर्स, फ्रीलान्सर्स आणि दररोज वापरणाऱ्या युजर्ससाठी आणलेली HP OmniBook सिरीजमध्ये चार मॉडेल्स आहेत – OmniBook Ultra 14, OmniBook 5 16, OmniBook 7 Aero 13 आणि OmniBook X Flip 14.
हे नवीन Copilot+ PC मॉडेल्स नव्या Intel Core Ultra 200V Series, AMD Ryzen AI 300 Series आणि Qualcomm Snapdragon X Series प्रोसेसरसह सुसज्ज आहेत. यामध्ये प्रति सेकंद 40 ते 55 TOPS (Trillion Operations Per Second) क्षमता असलेली Dedicated Neural Processing Unit (NPU) दिली आहे.
विविध मॉडेल्सची किंमत किती?
HP EliteBook 8 G1i ची सुरुवातीची किंमत ₹1,46,622 असून, HP EliteBook 6 G1q ₹87,440 पासून उपलब्ध आहे. HP ProBook 4 G1q ₹77,200 पासून सुरू होतो. हे सर्व मॉडेल्स सध्या HP Online Store वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, HP EliteBook 8 G1a आणि HP EliteBook 6 G1a या मॉडेल्सची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, पण कंपनीनुसार लवकरच ती ऑनलाइन स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
HP OmniBook Ultra 14 ₹1,86,499 पासून सुरू होतो, तर OmniBook X Flip 14 ₹1,14,999 पासून उपलब्ध आहे. HP OmniBook 7 Aero 13 ची सुरुवातीची किंमत ₹87,499 असून, OmniBook 5 16 ₹78,999 पासून सुरू होतो. हे सर्व मॉडेल्स HP Online Store आणि देशभरातील HP World Stores मध्ये खरेदीसाठी उपलब्ध असतील.
विविध मॉडेल्सचे बेसिक स्पेसिफिकेशन्स
HP EliteBook, ProBook आणि OmniBook सिरीजचे हे नवीन लॅपटॉप्स Intel, AMD आणि Qualcomm प्रोसेसरवर चालतात. यामध्ये 40 ते 55 ट्रिलियन TOPS कार्यक्षमतेची Dedicated NPU दिली आहे. HP EliteBook 8 G1i मध्ये Windows 11 Pro सह 14 इंच WUXGA IPS Touchscreen डिस्प्ले आहे, जो 800 निट्स ब्राइटनेस देतो.
हा लॅपटॉप Intel Core Ultra 5 238V प्रोसेसर आणि Intel Arc Graphics सह सुसज्ज आहे. यामध्ये 32GB RAM आणि 1TB SSD Storage दिले आहे. तसेच, यात 5 मेगापिक्सेल IR AI Camera आहे.
HP OmniBook Ultra 14 मध्ये Windows 11 Home देण्यात आले असून, 14-इंच IPS Touch Display 2.2K रिझोल्यूशनसह आहे. हा लॅपटॉप AMD Ryzen AI 9 HX 375 Processor आणि AMD Radeon 890M GPU सह सुसज्ज आहे. यात 32GB RAM आणि 1TB SSD Storage आहे. यामध्ये 9-मेगापिक्सेलचा IR AI Camera दिला आहे.
HP OmniBook X Flip, OmniBook 7 Aero आणि OmniBook 5 हे सर्व Windows 11 Home वर चालतात. OmniBook X Flip मध्ये 14-इंच OLED Ultra-Wide Viewing Angle (UWVA) Touch Display असून 3K रिझोल्यूशन आहे. OmniBook 7 Aero मध्ये 13.3-इंच WQXGA IPS Display आहे. OmniBook 5 मध्ये 16-इंच 2K IPS Display असून 300 निट्स ब्राइटनेस सपोर्ट आहे.