Honor या प्रसिद्ध ब्रँडने चीनमध्ये दोन दमदार स्मार्टफोन – Honor Play 60 आणि Honor Play 60m – अधिकृतपणे सादर केले आहेत. हे दोन्ही डिव्हाइस मागील वर्षीच्या Play 50 मालिकेचे (Play 50 Series) अपग्रेडेड व्हर्जन आहेत.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये जवळपास सारखाच हार्डवेअर सेटअप असून त्यांच्या रंगसंगतीत आणि किंमतीत थोडासा फरक आहे. चला, जाणून घेऊया या दोन स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमतीविषयी सविस्तर माहिती.
Honor Play 60 आणि Play 60m चे वैशिष्ट्ये
Honor Play 60 आणि 60m या दोन्ही स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यामध्ये ऑक्टा-कोर CPU आणि ARM G57 MC2 GPU आहे. हे फोन Android 15 वर आधारित MagicOS 9.0 वर चालतात.
दोन्ही डिव्हाइस 6.61-इंचाच्या TFT LCD डिस्प्लेसह येतात, ज्याचे रिझोल्यूशन 1604×720 पिक्सेल असून 1010 निट्सची पीक ब्राइटनेस आणि 10-पॉइंट मल्टीटचचा (10-point Multi-touch) सपोर्ट आहे. यामध्ये Eye Protection Mode आणि Natural Light Viewing Mode सुद्धा दिले आहेत.
कॅमेरा सेगमेंटमध्येही आहे खासियत
दोन्ही फोनमध्ये एकसारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 13MP चा मुख्य कॅमेरा (f/1.8) असून 10x डिजिटल झूम आणि 1080p रेकॉर्डिंगची क्षमता आहे. फ्रंट कॅमेरासाठी 5MP सेन्सर (f/2.2) असून तो सुद्धा 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकतो. Night Mode, Dual-View Video, HDR, Time-Lapse आणि Smile Capture यांसारखे फोटोग्राफी मोड्स फोनसोबत येतात.
हाय RAM आणि 6000mAh बॅटरीचा पॉवर
दोन्ही फोनमध्ये एकसारखे RAM आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन उपलब्ध आहेत – 6GB+128GB, 8GB+256GB आणि 12GB+256GB वेरिएंट्स. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6000mAh Battery दिली आहे, जी 5V/3A Wired Charging आणि Smart Charging Mode सपोर्ट करते. शिवाय, हे फोन IP64 Rating सह येतात, जे त्यांना धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवतात.
कनेक्टिव्हिटी आणि सिक्युरिटी फीचर्स
फोनमध्ये Dual SIM, Wi-Fi 5 (2.4GHz/5GHz), Bluetooth 5.3, GPS, USB Type-C Port, OTG, आणि 3.5mm Headphone Jack यांसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय दिले आहेत. सुरक्षेसाठी Face Unlock, App Lock, AI Face-Change Detection, Privacy Assistance, आणि Payment Protection यासारखे फीचर्सही उपलब्ध आहेत. त्याचबरोबर, E-book Mode, Device Clone, App Clone, आणि Gesture Navigation यांचा सुद्धा सपोर्ट देण्यात आला आहे.
Honor Play 60 आणि Play 60m चे किंमत व वेरिएंट्स
Honor Play 60 ची किंमत 6GB+128GB वेरिएंटसाठी 1,199 युआन (अंदाजे ₹14,000) आणि 8GB+256GB वेरिएंटसाठी 1,399 युआन (अंदाजे ₹16,000) आहे. हा फोन Ink Rock Black, Jade Dragon Snow आणि JiaoShan Qing अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Honor Play 60m च्या 6GB+128GB वेरिएंटची किंमत 1,699 युआन (अंदाजे ₹20,000), 8GB+256GB वेरिएंटची किंमत 2,199 युआन (अंदाजे ₹26,000) आणि 12GB+256GB वेरिएंटची किंमत 2,599 युआन (अंदाजे ₹30,000) आहे. हा फोन Ink Rock Black, Jade Dragon Snow आणि Morning Glow Gold अशा आकर्षक रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.