Garmin Vivoactive 6 स्मार्टवॉच: फुल चार्जवर 11 दिवसांची बॅटरी लाइफ, गोल AMOLED डिस्प्ले आणि पेमेंट सुविधा

Garmin Vivoactive 6 स्मार्टवॉच 11 दिवसांच्या बॅटरी लाइफसह येते. यात गोल AMOLED डिस्प्ले, हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स आणि Contactless Payment सपोर्ट आहे. किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.

On:
Follow Us

Garmin ने आपली नवीन स्मार्टवॉच Garmin Vivoactive 6 अमेरिकेत लाँच केली आहे. ही स्मार्टवॉच 1.2-इंचाच्या गोल AMOLED स्क्रीन सह येते, ज्यावर Corning Gorilla Glass 3 संरक्षण आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, फुल चार्ज केल्यावर ही वॉच 11 दिवसांपर्यंत टिकते.

यात स्मार्ट वेक अलार्म, बॉडी बॅटरी, स्लीप कोच, स्ट्रेस ट्रॅकिंग आणि HRV स्टेटस यांसारखे अनेक हेल्थ आणि वेलनेस फीचर्स देण्यात आले आहेत. ही स्मार्टवॉच Garmin Connect App सोबत काम करते. यामध्ये Garmin Pay सपोर्ट देखील आहे, ज्यामुळे Contactless Payment करणे शक्य होते.

Garmin Vivoactive 6 ची किंमत आणि उपलब्धता

Garmin Vivoactive 6 स्मार्टवॉचची किंमत $299.99 (अंदाजे ₹25,700) ठेवण्यात आली आहे. ही स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल आणि 4 एप्रिलपासून विक्री सुरू होईल. ही वॉच चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – Bone Band with Lunar Gold, Jasper Green Band with Metallic Jasper Green, Pink Dawn Band with Metallic Pink Dawn आणि Black Band with Slate.

Garmin Vivoactive 6 चे वैशिष्ट्ये

Garmin Vivoactive 6 मध्ये 1.2-इंच AMOLED स्क्रीन असून, तिचे रेझोल्यूशन 390×390 पिक्सेल आहे. यात Corning Gorilla Glass 3 संरक्षण आणि Always-on Display सपोर्ट आहे. वॉचमध्ये 80 हून अधिक प्रीलोडेड स्पोर्ट्स मोड्स आणि Garmin Coach सपोर्ट देण्यात आला आहे. ही स्मार्टवॉच iOS आणि Android दोन्ही स्मार्टफोन सोबत Garmin Connect App च्या माध्यमातून कनेक्ट करता येते.

Garmin च्या मते, Vivoactive 6 मध्ये स्मार्ट वेक अलार्म टूल आहे, जो झोपेच्या हलक्या टप्प्यात वापरकर्त्याला सौम्य कंपनांसह जागं करतो. तसेच, वॉच झोपेचे विश्लेषण, रिकव्हरी इनसाइट्स, बॉडी बॅटरी, डेली कॅलेंडर आणि इतर डेटा दर्शवते.

हेल्थ आणि वेलनेस फीचर्स

Garmin Vivoactive 6 मध्ये Body Battery फीचर आहे, जे वापरकर्त्याच्या दिवसभरातील ऊर्जा पातळीवर लक्ष ठेवते आणि सर्वोत्तम विश्रांती आणि सक्रियतेचा वेळ सुचवते. हे झोप, डेली अ‍ॅक्टिव्हिटी आणि तणावामुळे होणाऱ्या बदलांबद्दल माहिती देते.

स्मार्टवॉचमध्ये स्लीप कोच, मेडिटेशन आणि माइंडफुल ब्रीदिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग, पीरियड ट्रॅकिंग, Pulse OX (ब्लड ऑक्सिजन लेव्हल ट्रॅकिंग) आणि HRV स्टेटस (हार्ट रेट व्हेरिएबिलिटी मॉनिटरिंग) यांसारखे आरोग्यविषयक फिचर्स देण्यात आले आहेत.

Contactless Payment आणि म्युझिक स्ट्रीमिंग सपोर्ट

Garmin Vivoactive 6 मध्ये Garmin Pay सपोर्ट आहे, ज्यामुळे Contactless Payment करणे शक्य आहे. तसेच, वॉचमध्ये Spotify, Amazon Music आणि Deezer सारख्या प्लॅटफॉर्मवरून गाणी आणि प्लेलिस्ट डाउनलोड करण्याची सुविधा आहे.

बॅटरी लाइफ आणि डिझाइन

Garmin Vivoactive 6 बद्दल कंपनीचा दावा आहे की फुल चार्जवर 11 दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. मात्र, Always-on Display सुरू असेल तर ही वॉच 5 दिवस टिकते. या वॉचला 5 ATM Water Resistance Rating मिळाली आहे, म्हणजेच ती पाण्यात वापरण्यास योग्य आहे.

वॉचचे परिमाण: 42.2 x 42.2 x 10 मिमी
वजन (स्ट्रॅपशिवाय): 23 ग्रॅम

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel