Dussehra Sale: फेस्टिव सेलचा प्रारंभ 26 सप्टेंबरपासून झाला होता, ज्यामध्ये ई-कॉमर्स साइट्स स्मार्टफोनसह इतर प्रोडक्ट्सवर जबरदस्त सवलत देत आहेत. आता दसऱ्याच्या निमित्ताने Samsung, iphone स्मार्टफोन कंपन्याही थेट सूट देत आहेत.
जर तुम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा सर्वोत्तम वेळ आहे. कारण सॅमसंग (Samsung) आणि अॅपल (Apple) सारख्या कंपन्या त्यांच्या फोनवर अप्रतिम सवलती देत आहेत. या ऑफरमध्ये तुम्हाला प्रीमियम फोन EMI वरही खरेदी करण्याची संधी मिळेल.
Samsung देत आहे हे ऑफर:
सॅमसंग भारतात सर्वाधिक स्मार्टफोन्स विकणारी कंपनी आहे. कंपनीकडे बजेट फोनपासून प्रीमियम सेगमेंटपर्यंत विविध स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. सॅमसंगकडून यापैकी सर्वच फोनवर उत्तम सवलत दिली जात आहे. जर तुम्ही सॅमसंगचा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Galaxy Z Fold6, Galaxy S24, Galaxy S24 Ultra आणि Galaxy A35 | A55 5G हे फोन तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता.
स्मार्टफोन | किंमत | सवलत |
---|---|---|
Galaxy Z Fold6 | ₹1,64,999 | ₹12,500 त्वरित बँक डिस्काउंट |
Galaxy S24 | ₹67,999 | ₹3,000 त्वरित बँक डिस्काउंट |
Galaxy S24 Ultra | ₹1,21,999 | ₹12,000 त्वरित बँक डिस्काउंट |
Galaxy A35 | A55 5G | ₹30,999 |
याशिवाय सॅमसंगच्या लेटेस्ट Galaxy Z Flip6 (Special Colour), Galaxy Z Flip6 आणि Galaxy F55 5G फोनसह इतर अनेक फोनवर देखील चांगले डिस्काउंट ऑफर केले जात आहेत, ज्याचा लाभ तुम्ही सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन घेऊ शकता.
Apple iPhone वर मिळणार आहे ही ऑफर:
अॅपलने अलीकडेच iPhone 16 सीरीज लॉन्च केली आहे, ज्यावर अॅपलकडून 10,000 रुपयांचा त्वरित कॅशबॅक निवडक बँक कार्डांवर दिला जात आहे. त्याचप्रमाणे iPhone 15 सीरीजवरही 10,000 रुपयांचा त्वरित कॅशबॅक दिला जात आहे. अॅपलच्या फेस्टिव्हल ऑफरमध्ये नो-कॉस्ट EMI चा पर्याय देखील उपलब्ध आहे.