भारतीय ब्रँड boAt ने आपली दोन नवीन स्मार्टवॉच boAt Ultima Prime आणि boAt Ultima Ember भारतीय बाजारात सादर केल्या आहेत. Ultima Prime मध्ये गोल डायल आहे, तर Ultima Ember स्क्वेअर डायलसह येते. दोन्ही घड्याळे आकर्षक डिझाइन आणि ऍडव्हान्स फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स सह येतात. यामध्ये AMOLED डिस्प्ले उपलब्ध आहे. किंमत किती आहे आणि यामध्ये काय खास आहे? जाणून घेऊया संपूर्ण माहिती…
boAt Ultima Prime ची खास वैशिष्ट्ये
boAt Ultima Prime हे एक फीचर-पॅक स्मार्टवॉच आहे, जे ऍक्टिव्ह लाइफस्टाइल असलेल्या लोकांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये 1.43 इंच AMOLED ऑलवेज-ऑन स्क्रीन देण्यात आली आहे, जी 466×466 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 700 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट करते. यामुळे प्रखर सूर्यप्रकाशातही स्पष्ट दृश्यता मिळते. यामध्ये Wake Gesture फिचर देखील आहे.
बॅटरी परफॉर्मन्सबाबत बोलायचे झाल्यास, फुल चार्ज केल्यानंतर घड्याळ 5 दिवसांपर्यंत टिकते, मात्र Bluetooth Calling वापरल्यास बॅटरी लाइफ थोडी कमी होऊ शकते. यामध्ये फंक्शनल क्राउन नेव्हिगेशनसाठी देण्यात आले आहे. तसेच, IP68 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स असल्याने हे घड्याळ कोणत्याही परिस्थितीत वापरता येते.
यामध्ये Bluetooth Calling साठी हाय-क्वालिटी मायक्रोफोन आणि स्पीकर देण्यात आले आहेत. तसेच, Dial Pad आणि 20 कॉन्टॅक्ट सेव करण्याची सुविधा आहे. फिटनेस ट्रॅकिंगसाठी, हे घड्याळ स्टेप काउंट, बर्न झालेल्या कॅलरीज आणि चाललेले अंतर मोजण्याची सुविधा देते. याशिवाय, हायड्रेशन रिमाइंडर आणि सेडेंटरी अलर्ट देखील देण्यात आले आहेत.
आरोग्य निगडीत वैशिष्ट्यांमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग, स्ट्रेस मॉनिटरिंग, पीरियड ट्रॅकर आणि गाइडेड ब्रीदिंग एक्सरसाइज यांचा समावेश आहे. तसेच, यात 100+ स्पोर्ट्स मोड्स सपोर्ट केले जातात, जे वेगवेगळ्या वर्कआउट आणि ऍक्टिव्हिटीसाठी उपयोगी आहेत.
याशिवाय, अलार्म, टाइमर, स्टॉपवॉच, कॅमेरा आणि म्युझिक कंट्रोल, कॅल्क्युलेटर, गेम आणि रिअल टाइम वेदर अपडेट सारखी वैशिष्ट्ये देखील यामध्ये देण्यात आली आहेत.
boAt Ultima Ember ची खास वैशिष्ट्ये
boAt Ultima Ember मध्ये 1.96-इंच AMOLED स्क्रीन आहे, ज्यामध्ये 368×448 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 800 निट्स ब्राइटनेस सपोर्ट आहे. यात ऑलवेज-ऑन डिस्प्ले फिचर आहे. हे घड्याळ 15 दिवसांपर्यंतची बॅटरी लाइफ देऊ शकते, मात्र Bluetooth Calling वापरल्यास बॅटरी लाइफ कमी होते.
Ultima Prime आणि Ultima Ember मध्ये बहुतांश वैशिष्ट्ये समान आहेत. यामध्ये Bluetooth Calling, हाय-क्वालिटी मायक्रोफोन आणि स्पीकर, 20 कॉन्टॅक्ट स्टोरेज आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी हृदय गती, SpO2, स्लीप ट्रॅकिंग यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
किंमत आणि उपलब्धता
boAt Ultima Prime हे Onyx Black, Silver Mist, Forest Green, Royal Berry, Rose Gold आणि Steel Black अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर boAt Ultima Ember हे Bold Black, Silver Mist, Royal Berry, Rose Gold, Mist Blue आणि Steel Black अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे.
ही दोन्ही स्मार्टवॉच boAt ची अधिकृत वेबसाइट, Amazon, Flipkart आणि निवडक रिटेल स्टोअर्स वर फक्त ₹1,899 मध्ये उपलब्ध आहेत.