boAt कंपनीने भारतीय बाजारात आपली नवी स्मार्टवॉच लॉन्च केली आहे. या नव्या वॉचचं नाव boAt Chrome Horizon असं आहे. याची किंमत ₹2799 (सिलिकॉन स्ट्रॅप व्हेरिएंट) आहे, तर लेदर आणि मेटल स्ट्रॅप व्हेरिएंट साठी तुम्हाला ₹3099 मोजावे लागतील.
ही स्मार्टवॉच तुम्ही Amazon India, Flipkart, आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. ही घड्याळी Midnight Black, Royal Blue, Steel Black आणि Coco Brown अशा तीन कलर ऑप्शन्समध्ये (color options) उपलब्ध आहे.
यात हार्ट रेट (Heart Rate) आणि SpO2 सेन्सर, तसेच 7 दिवसांची बॅटरी लाइफ (Battery Life) देण्यात आली आहे. चला, याचे फीचर्स जाणून घेऊया.
वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स
बोटच्या या नव्या वॉचमध्ये 1.51 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 466 x 466 पिक्सल रिझोल्यूशन आणि 2.5D कर्व्ह्ड ग्लाससह येतो. याचे पीक ब्राइटनेस लेव्हल (peak brightness level) 600 निट्स इतकं आहे. या वॉचमध्ये वेक जेस्चर (Wake Gesture) चा सपोर्ट दिला गेला आहे.
तसेच, यामध्ये व्हिडिओ वॉच फेस (Video Watch Face) आणि ॲनिमेटेड वॉच फेस (Animated Watch Face) सुद्धा आहेत, जे तुम्ही तुमच्या मूडप्रमाणे सेट करू शकता.
ही स्मार्टवॉच Bluetooth V5.3 कॉलिंग ला सपोर्ट करते. यामध्ये डायल पॅड (Dial Pad) आणि एकावेळी 30 कॉन्टॅक्ट्स सेव करण्याचा पर्याय दिला आहे. बोटची ही लेटेस्ट वॉच boAt Crest App Health Ecosystem ला सपोर्ट करते. यात SpO2 आणि हार्ट रेट सेन्सर (Heart Rate Sensor) मिळतो.
तसेच ही वॉच स्लीप आणि स्ट्रेस ट्रॅकिंग (Sleep and Stress Tracking) ची सुविधा देते. यामध्ये गाईडेड ब्रीदिंग (Guided Breathing) फिचर सुद्धा आहे.
ही वॉच 100 पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड्स (Sports Modes) सह येते. यात ऑटो अॅक्टिविटी डिटेक्शन (Auto Activity Detection) देखील आहे. वॉचमध्ये 300mAh बॅटरी देण्यात आली असून ती 7 दिवसांपर्यंत टिकते. ही बॅटरी ASAP चार्जिंग (ASAP Charging) ला सपोर्ट करते.
या स्मार्टवॉचमध्ये अलार्म, वेदर, टॉर्च, गेम्स, म्युझिक आणि कॅमेरा कंट्रोल, कॅलेंडर, कॅल्क्युलेटर यांसारखी युटिलिटी टूल्स दिली आहेत. याशिवाय, इमर्जन्सी SOS अलर्ट, नोटिफिकेशन अलर्ट्स, फाइंड माय डिव्हाइस (Find My Device) आणि व्हॉइस असिस्टंट (Voice Assistant) सारखी स्मार्ट फीचर्सही मिळतात.
ही वॉच IP68 डस्ट, स्वेट आणि स्प्लॅश प्रूफ (Dust, Sweat and Splash Proof) रेटिंगसह येते. तसेच, यावर एक वर्षाची वॉरंटी (1-Year Warranty) दिली जाते.