Smartphones Under 10K: भारतामध्ये कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेले स्मार्टफोन्स मोठ्या प्रमाणात मागणीस आहेत. याच पार्श्वभूमीवर, आम्ही तुम्हाला 256GB स्टोरेज आणि आकर्षक लूकसह 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या काही अप्रतिम स्मार्टफोन्सची माहिती देणार आहोत. हे फोन्स तुमच्या बजेटमध्ये असूनही उत्कृष्ट फीचर्स प्रदान करतात. यामध्ये इनफिनिक्स (Infinix) आणि आयटेल (iTel) चे फोन्स समाविष्ट आहेत.
itel A70
या स्मार्टफोनच्या 4GB+256GB व्हेरिएंटची किंमत 7,299 रुपये आहे. तुम्ही हा फोन ई-कॉमर्स साइट्सवर अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) वरून खरेदी करू शकता. या फोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. तसेच, यामध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे.
Infinix HOT 40i
इनफिनिक्सच्या या फोनच्या 8GB+256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोन युनिसॉक T606 प्रोसेसरसह येतो. या फोनमध्ये 6.6 इंचाचा HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.
itel P55 Plus
iTel चा हा फोनही बजेट फ्रेंडली स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो. या फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. याची किंमत 8,999 रुपये आहे आणि हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट व अमेझॉन दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता.
या फोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.