Apple लवकरच आपल्या नव्या प्रोडक्ट्सची घोषणा करू शकते, ज्यामध्ये iPad Air 6th Gen, MacBook Air आणि एंट्री-लेव्हल iPad 11 समाविष्ट असण्याची शक्यता आहे. 2025 मध्ये iPhone 16e लाँच करून Apple ने आपली नवीन उत्पादने सादर करण्याची सुरुवात केली आहे. ही डिव्हाइसेस भारतात 28 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
Apple च्या नव्या लाइनअपमध्ये M3 चिप असलेला iPad Air, M4 चिप असलेला MacBook Air आणि A17 प्रो प्रोसेसरसह iPad 11 लाँच केला जाऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, हे डिव्हाइसेस मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान बाजारात येऊ शकतात. Apple आपल्या सप्लाय चेनमध्ये मोठे बदल करत असून, यामुळे आगामी काही महिन्यांत नव्या प्रोडक्ट्सबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
iPad Air 6th Gen मध्ये M3 चिपचा वापर केला जाईल, जो सध्याच्या M1 चिपपेक्षा अधिक शक्तिशाली असेल. हा टॅब्लेट 11-इंच आणि 13-इंच डिस्प्लेसह येईल. यामध्ये Wi-Fi 7 आणि Apple चा इन-हाउस 5G मॉडेम (C1) दिला जाण्याची शक्यता आहे.
MacBook Air मध्ये M4 चिप देण्यात येईल, जी स्पीड आणि बॅटरी लाइफमध्ये सुधारणा करेल. हा लॅपटॉप 13-इंच आणि 15-इंच स्क्रीनसह उपलब्ध होईल. यामध्ये 16GB रॅम, अपग्रेडेड 12MP सेंटर स्टेज कॅमेरा आणि एक्सटर्नल डिस्प्लेसाठी विस्तारित सपोर्ट मिळेल.
iPad 11 मध्ये A17 प्रो चिप वापरण्यात येईल, जी iPhone 15 Pro मध्ये देखील होती. यात Wi-Fi 6E/7 आणि ब्लूटूथ 5.3 सपोर्ट असण्याची शक्यता आहे. Apple या iPad साठी नवा Magic Keyboard सादर करू शकतो, जो अधिक चांगला टायपिंग अनुभव देईल.
Apple एका नव्या स्मार्ट होम डिव्हाइसवर देखील काम करत आहे, ज्याचे कोडनेम J490 आहे. हे डिव्हाइस HomeKit आणि Apple Apps सोबत इंटिग्रेट केले जाईल. Apple ने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नसली तरी, रिपोर्ट्सनुसार हे डिव्हाइस मार्च किंवा एप्रिलमध्ये सादर केले जाऊ शकते.