Apple ने आपल्या अत्याधुनिक iPhone 16 सीरीजच्या जागतिक लाँचनंतर अनेक नवीन प्रोडक्ट्सवर काम सुरू केले आहे. यामध्ये iPhone SE 4 हा महत्त्वाचा प्रोडक्ट मानला जात आहे, जो कंपनी किफायतशीर (affordable) किंमत श्रेणीत सादर करणार असल्याचे बोलले जात आहे. लाँचपूर्वी यासंदर्भात अनेक माहिती समोर येत आहे.
iPhone SE चा मागील वेरिएंट
Apple ने iPhone SE चा मागील मॉडेल 2022 मध्ये सादर केला होता. सध्या आलेल्या रिपोर्ट्सनुसार, iPhone SE 4 चा डिझाइन iPhone 14 सारखा असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या फोनसंबंधी मिळालेली महत्त्वाची माहिती येथे सांगितली आहे.
2025 मध्ये होणार अधिकृत लाँच?
काही रिपोर्ट्सनुसार, ऍपल या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरपर्यंत iPhone SE 4 च्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला सुरुवात करू शकते. हा फोन अधिकृतपणे एप्रिल 2025 मध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, कंपनीने याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. तरीही, यासंदर्भात अनेक अहवाल चर्चेत आहेत.
ऍपलच्या डेटाबेसमध्ये लिस्टेड
ताज्या माहितीनुसार, हा डिव्हाइस ऍपलच्या डेटाबेसमध्ये V59 या कोडनेमखाली लिस्ट झाला आहे. एका टिपस्टरने नुकताच सोशल मीडियावर iPhone SE (2025) च्या केसचा फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्याचा मागील पॅनल दिसत आहे. हा पॅनल iPhone 7 Plus सारखा वाटतो, ज्यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिसतो.
48MP प्राइमरी कॅमेरा सेटअप
स्पेसिफिकेशनच्या दृष्टीने, iPhone SE 4 मध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच, या सीरीजमध्ये 48MP प्राइमरी कॅमेरा असलेला हा पहिला फोन ठरणार आहे. हा OLED डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
A18 बायोनिक चिपसह उत्कृष्ट परफॉर्मन्स
iPhone SE 4 मध्ये नवीनतम A18 बायोनिक चिपसेट देण्यात येणार आहे, जो 8GB LPDDR5 रॅमला सपोर्ट करेल. स्टोरेजच्या पर्यायांमध्ये 128GB, 256GB, आणि 512GB वेरिएंट उपलब्ध असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये मागील पिढीच्या आयफोनच्या तुलनेत अनेक सुधारित फीचर्स पाहायला मिळतील. तसेच, किफायतशीर सेगमेंटमध्ये ऍपल AI-आधारित फिचर्सही देऊ शकते.