iPad Mini ला एक नवीन अपडेट मिळत आहे. ऍपलने 7व्या पिढीचा iPad Mini सादर केला आहे, जो जुन्या डिझाइनसह येतो, मात्र आता यात A17 Pro चिप आहे, जी मागील वर्षीच्या iPhone 15 Pro मध्ये वापरण्यात आली होती. ऍपलच्या मते, ही चिप “Apple Intelligence” साठी डिझाइन केली आहे. चला तर मग, iPad Mini 7th Generation ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
iPad Mini 7th Generation: Price
नवीन iPad Mini आजपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि 23 ऑक्टोबरपासून स्टोअर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल.
- Wi-Fi मॉडेल: ₹49,900
- सेल्युलर मॉडेल: ₹64,900
iPad Mini 7th Generation: Specifications
iPad Mini मध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे A17 Pro चिप, जी मागील वर्षीच्या iPhone 15 Pro मालिकेत वापरण्यात आली होती. या चिपमुळे CPU चा कार्यक्षमतेत 30% आणि ग्राफिक्समध्ये 25% वाढ होणार आहे. याचा न्यूरल इंजिन आता दोन पट वेगवान झाला असून “Apple इंटेलिजन्स” सोबत प्रभावीरीत्या काम करतो.
डिझाइनबाबत फारसा बदल नाही, हे मॉडेल जवळपास 2021 मधील आवृत्तीप्रमाणेच दिसते.
Display and camera
- 8.3 इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले
- रिझॉल्युशन: 2266×1488
- फ्रंट कॅमेरा: 12MP (पोर्ट्रेट ओरिएंटेशन आणि सेंटर स्टेज सपोर्टसह)
- रिअर कॅमेरा: 12MP (स्मार्ट HDR 4 सपोर्टसह)
Connectivity and Storage
- Wi-Fi 6E सपोर्ट: जलद कनेक्टिव्हिटी
- USB-C पोर्ट: 10Gbps पर्यंत डेटा ट्रान्सफर स्पीड
- 5G सेल्युलर मॉडेल: वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटी
- स्टोरेज ऑप्शन्स:
- बेस मॉडेल: 128GB
- नवीन पर्याय: 512GB
Accessories support
- Apple Pencil Pro साठी सपोर्ट