जर तुमचे बजेट 11 ते 12 हजार रुपये असेल आणि तुम्हाला उत्तम कॅमेरासह स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर Poco चा हा फोन तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल. फ्लिपकार्टवर सुरू झालेल्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये हा फोन मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे.
पोको Poco X6 Neo 5G मध्ये 108MP कॅमेरा, 120Hz डिस्प्ले आणि स्टायलिश ग्लास डिझाइन आहे. या सेलमध्ये तुम्हाला 4000 रुपयांची सवलत मिळते. आता फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनवरील ऑफर्सविषयी सविस्तर माहिती पाहूया.
Poco X6 Neo 5G: 4000 रुपयांची जबरदस्त सूट
पोकोचा हा सर्वात पातळ स्मार्टफोन फ्लिपकार्टवर थेट 3000 रुपयांच्या सवलतीसह विकला जात आहे. फोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये थेट 3000 रुपयांच्या सवलतीनंतर हा फोन 12,999 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय, 1000 रुपयांची बँक सूट देखील दिली जात आहे, जी सर्व बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे मिळवता येईल.
हा स्मार्टफोन तुम्ही Horizon Blue, Astral Black, आणि Martian Orange अशा तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता. यासोबतच 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट देखील उपलब्ध आहे, जो तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.
Poco X6 Neo 5G चे जबरदस्त फीचर्स
पोको X6 Neo मध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ रिझोल्यूशन असलेला डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटची स्क्रीन मिळते. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यामध्ये MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर आहे.
फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाले, तर यात मागील बाजूस 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे, ज्यासोबत 33W टाइप-C फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.