आज आपण दाजीबा सरकार बद्दल जाणून घेणार आहोत. दाजीबा सरकार यांनी केलेल्या कृत्यांची त्यांना काय शिक्षा मिळाली या बद्दल देखील माहिती घेऊ या.
श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण
श्री स्वामी समर्थ महाराज यांची शिकवण, उपदेश, बोध हे कालातीत असून ते समाजासाठी नेहमीच उपयोगी ठरतात. मनुष्य हा आशावादी प्राणी आहे. बहुतांश लोक हे समोरच्या व्यक्तीवर त्याच्या बोलण्यावर आणि कृतीवर लगेच विश्वास ठेवतात.

कारण माणसाला आशावाद असतो कि समोरची व्यक्ती त्याचे नुकसान करणार नाही. परंतु अति विश्वासामुळे अनेक समस्या समोर येतात. अश्याच एका प्रसंगात श्री स्वामी समर्थ महाराज कोणावरही आंधळा विश्वास नाही केला पाहिजे अशी शिकवण देतात.
दाजीबा सरकारचे पुढे काय झाले
तर प्रसंग असा आहे कि मालोजी राजे यांचे कारभारी दाजीबा यांना इंग्रज अटक करतात. दाजीबा यांचा स्वभाव अतिशय कठोर असल्याने तो इंग्रजांसोबत उर्मटपणाने वागतो.
तर मालोजी राजे जामीन आणि दंड भरून दाजीबाला सोडवून आणतात. ते एवढ्यावरच थांबत नाहीत तर दाजीबाला प्रमुख कारभारी म्हणून नियुक्त करतात. सर्व न्यायनिवाडा दाजीबाच्या हातात दिला जातो.
स्वामींच्या कानावर दाजिबांची तक्रार
त्यामुळे दाजीबा अविवेकाने शुल्लक अपराधासाठी देखील कठोर शिक्षा जनतेला देतो. स्वामींच्या कानावर दाजिबांची सर्व हकीकत येते. तसे स्वामी चोळप्पाला म्हणतात कि जसा राजा तशी प्रजा.
राजाला सुद्धा कळत नाही कोणावर विश्वास ठेवावा. दाजीबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणि त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणाऱ्या राजाला देखील भोगावे लागणार आणि स्वामी पुढे चोळप्पा यांना सांगतात कि राजाकडे जाऊन त्याला सांग कि प्रजा सुखी नाही.
न्यायपदाधिकाऱ्यामुळे प्रजा हैराण झाली आहे. स्वामींच्या आज्ञे प्रमाणे चोळप्पा राजाला जाऊन प्रजेला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगतात. त्यावर मालोजी राजे म्हणतात कि आमचे रयतेवर पूर्ण लक्ष आहे. आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केली आहे. असे म्हणून मालोजी राजे चोळप्पांचे बोलणे दुर्लक्षित करतात.
त्यानंतर पुढे काही दिवसांनी मालोजी राजांना संस्थान जप्त करण्याचा खलिता इंग्रजांकडून येतो. ते पाहून मालोजी राजे यांना धक्का बसतो आणि ते स्वामींना शरण जातात.
स्वामी मालोजी राजे यांची चांगलीच हजेरी घेतात आणि म्हणतात कि चुकीचा माणूस अटक झाल्या नंतर सावध होण्या ऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली. दाजीबा आधीच मर्कट त्यावर बढतीचे म’द्य दिले. त्याचाच हा परिणाम आहे.
प्रजेला खूपच सोसावे लागत आहे. यावर दाजीबा देखील स्वामींची क्षमा मागतो. त्यावर स्वामी दाजीबाला म्हणतात तुला क्षमा नाही. तुला इंग्रज शिपाई पकडून घेऊन जातील. हे वाक्य संपते न संपते तोच इंग्रज शिपाई येतात आणि दाजीबाला अटक करतात.
तर पुढे मालोजी राजे स्वामींची करुणा भाकतात. त्यावर स्वामी मालोजी राजेंना म्हणतात मालोजी तू गुरूपदेश मानला नाहीस. शेवटी आपल्या मनाचेच केलेस कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. सारासार विचार करून निर्णय घ्यावा हे ऐकून राजे स्वामींपुढे नतमस्तक होतात. तर दाजीबाला त्याने केलेल्या कर्माची शिक्षा म्हणून उर्वरित आयुष्य कारागृहात काढावे लागते.