सलमान खान (Salman Khan) व्यतिरिक्त त्याचे दोन्ही भाऊ अरबाज आणि सोहेल खान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. सलमान खानने आजपर्यंत लग्न केलेले नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे.
त्याचवेळी त्याचा भाऊ अरबाज खानने पत्नी मलायका अरोरा आणि अरबाज खानने पत्नी सीमाला घटस्फोट दिला आहे. अशा परिस्थितीत आता अरबाज खान आणि सोहेल खान यांनी सलमान खानच्या सांगण्यावरून पत्नीला घटस्फोट दिल्याचे समोर आले आहे. याचा खुलासा खुद्द भाईजानने केला आहे.
अलीकडेच सलमान खान (Salman Khan) कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला. येथे तो त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. यावेळी सलमान खानसोबत चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्टही उपस्थित होती.
शोमध्ये कपिल शर्माने अभिनेत्याला एक मजेदार प्रश्न विचारला. कपिल शर्माने सलमान खानला विचारले, ‘तुझे तीनही भाऊ तुला लग्नासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आम्ही चित्रपटात पाहिले आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अरबाज आणि सोहेल भाई तुम्हाला म्हणाले नाही का, ‘हमारी तो कभी सुनी नहीं उनकी बहुत सुन रहे हैं’.
कपिल शर्माची ही चर्चा ऐकल्यानंतर सलमान खान म्हणतो, ‘उन्होंने कभी मेरी बात नहीं सुनी. अब सुन रहे हैं’. हे बोलल्यावर कपिल शर्मा आणि सलमान खान हसायला लागले. भाईजानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Bhoi joking about his brothers getting divorced
by u/HardTune272 in BollyBlindsNGossip
सलमान खानच्या चाहत्यांना या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट गेल्या महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.