Director Saavan Kumar Tak Death: सावन कुमार (Saavan Kumar Tak) हे हिंदी सिनेसृष्टी मध्ये एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे त्याच सोबत ते गीतकार आणि निर्माते देखील होते. सावन कुमार यांचे मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने आणि अवयव काम करणे बंद केल्यामुळे निधन झाले. सावन कुमार यांचे वय 86 वर्ष झाले होते. त्यांना फुफुसाच्या आजाराने त्रस्त केले होते. त्यातच त्यांना काही दिवसापूर्वी न्यूमोनिया झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सावन कुमार यांनी मीना कुमारी पासून ते सलमान खान या सारख्या अनेक प्रसिद्ध स्टार्स सोबत काम केले आहे. ‘नौनिहाल’ हा सावन कुमार यांचा निर्माता म्हणून पहिला चित्रपट होता.

सावन कुमार यांनी मीना कुमारी सोबत दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘गोमती किनारे’ हा 1972 साली केला होता हा चित्रपट त्यावेळी सर्वात मोठा हिट झाला होता.

सलमान खान (Salman Khan) यांच्या सोबत देखील सावन कुमार यांनी ‘सनम बेवफा’ हा हिट चित्रपट दिला होता. सावन कुमार यांनी राजेश खन्ना, श्रीदेवी, जितेंद्र, जया प्रदा यांच्या सोबत देखील काम आहे. स्त्रीप्रधान चित्रपट ही त्यांची खासियत होती.