Connect with us

जाणून घ्या थायराइडचे सुरुवातीचे लक्षण काय असतात

Health

जाणून घ्या थायराइडचे सुरुवातीचे लक्षण काय असतात

थायराइड हि समस्या एक अत्यंत गंभीर आजार आहे जर थायराइड चा आजार वेळेवर समजला तर त्याचा उपचार करणे शक्य आहे. थायराइड बहुतेक वेळा आयोडीनच्या कमीमुळे होतो. कधीकधी थायराइडच्या ग्रंथी वाढल्याने देखील होतो. थायराइड एक लहान ग्रंथी आहे जी गळया मध्ये असते.

चला पाहू थायराइडचे सुरुवातीचे लक्षण काय असतात

थायराइडच्या समस्ये मध्ये डिप्रेशनचा त्रास उत्पन्न होतो जेव्हा थायराइड ग्रंथी मधून थायरॉक्सीन कमी प्रमाणात उत्पन्न होते ज्याचा परिणाम म्हणून तुमचा तणाव वाढू लागतो.

वेगाने वजन कमी किंवा जास्त होणे

थायराइडच्या समस्ये मध्ये पचनक्रिया प्रभावित होते जो आहार आपण खातो त्यास पूर्णपणे उर्जे मध्ये बदलल्या जात नाही त्यामुळे शरीरामध्ये चरबी जमा होते ज्यामुळे आपले वजन वाढ होते. तर काही व्यक्तींमध्ये याचा उलटा परिणाम होतो वजन वाढण्याच्या एवजी वजन कमी होते.

अशक्त आणि थकवा जाणवणे

थायराइडच्या आजारा मध्ये व्यक्तीला शारीरिक अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. अनेक वेळा या समस्येमुळे एनीमियाची समस्या होण्याची शक्यता देखील असते.

पोटाच्या संबंधित समस्या

थायराइडचा आजार व्यक्तीला पोटाच्या संबंधित समस्या जसे बद्धकोष्ठता, पोटामध्ये गैस होणे, जडपणा, पचनक्रियेत गडबड इत्यादी लक्षण दिसायला लागतात.

छाती मध्ये दुखणे

थायराइडचा आजारामुळे हृद्य गती अनियमित होते ज्यामुळे छाती मध्ये दुखण्याची समस्या होते.

स्मरणशक्तीची समस्या

थायराइड झालेल्या व्यक्तीची स्मरणशक्ती प्रभावित होते व्यक्ती लहानलहान गोष्टी विसरू लागतो या आजाराचा प्रभाव यांच्या स्वभावा मध्ये देखील दिसू लागतो. व्यक्ती चिडचिडी होते.

जास्त थंडी किंवा गरमी होणे

ज्यालोकांना थायराइडचा त्रास असतो त्यांना बदलणाऱ्या हवामानाचा जास्त त्रास होतो. त्या व्यक्तीला जास्त थंडी किंवा गरम होते. ते थंडी आणि गरम दोन्ही सहन करू शकत नाहीत.

थायराइडच्या समस्ये पासून असे वाचावे

जर तुम्हाला थायराइडच्या समस्ये पासून सुटका पाहिजे असेल तर आपले वजन नियंत्रणात ठेवा. तुम्ही आपल्या आहारा मध्ये फाईबर युक्त आणि कमी चरबी वाल्या वस्तू शामिल करा. सतत शारीरिक गतीविधी करत राहावे, जर तुम्ही जास्त तणाव घेतला तर यामुळे थायराइड वाढण्यासाठी मदत होते यासाठी शक्य तेवढे तणावा पासून दूर राहा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top