People

तुम्ही ड्रिंक्सचे (दारूचे) शौकीन असाल तर ही बातमी जरूर वाचा नाहीतर नंतर पश्चाताप होईल

ही बातमी तुम्हाला वाटत असेल की दारू महाग महाग झाल्याची असेल तर असे मुळीच नाही. कारण दारू पिणे ड्रिंक्स घेणे आजच्या तरुणाईला फैशन वाटते तर इतर लोक मौज मस्ती आणि नशा म्हणून दारू घेतात त्यामुळे दारू महाग असो किंवा स्वस्त ती तेवढीच खरेदी विक्री होते. पण दारू पीत असाल तर सावधानता बाळगण्याची वेळ आली आहे कारण असे पाहण्यात आले आहे की अनेक अपघात दारू पिण्या नंतर होतात. पण तुम्हाला वाटत असेल की जर अपघात झाला तर हॉस्पिटल मध्ये जाऊन आपण उपचार करू पण ही गोष्ट इथे संपत नाही. कारण तुम्ही दारू पिऊन अपघात केला आणि त्या अपघाता मध्ये एखाद्याचा मृत्यू झाला आणि तुम्ही दारू पिलेल्या अवस्थेत पोलीसांच्या कडून पकडले गेले तर पूर्वी 2 वर्षाची जेल होती.

पण हल्लीच सुप्रीम कोर्ट ने दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे एखादाचा मृत्यू झाला तर 2 वर्षाची सजा कमी असल्याचे सांगितले आहे आणि ही सजा 7 वर्षाची केली जात आहे. रोड दुर्घटनेत अश्या केसेस अनेक आल्या आहेत ज्यामुळे दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे ते दुसऱ्याच्या मृत्यूचे कारण बनले आहेत त्यांना भारतीय दंड संहिता अनुच्छेद अनुसार 304 ए नुसार 2 वर्षाची सजा कमी आहे यासाठी 7 वर्षाची केली जात आहे.

हे तर तुमची काळजी अजून वाढवेल :

सरकार ने गृह मंत्रालयाला विनंती केली आहे की लोक रोड वर दारू पिऊन गाडी चालवताना पकडले जातात आणि त्यांच्या द्वारे कोणात्याही प्रकारची दुर्घटना होते तर त्यांच्यावर निष्काळजीपणे गाडी लवण्याचा गुन्हा नोंदवण्या एवजी मानव हत्याचा दावा चालवावा. ज्यामध्ये 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे ज्यामुळे दारू पिऊन गाडी चालवण्याचे प्रमाण कमी होईल किंवा तसे करणे लोक बंद करतील.

गाडी होणार महाग :

दुसरा महत्वाचा निर्णय सरकारने हा घेतला आहे की नवीन गाडी खरेदी होते आणि त्याचे रजिस्ट्रेशन केले जाते तेव्हा थर्ड पार्टी लाइफटाईम विमा अनिवार्य करण्यात आला आहे जो पहिले 1 वर्षा नंतर रिन्यू करावा लागत असे. पण सरकार ने हा कायदा बदलून लाइफटाईम केला आहे. ज्यामुळे गाड्यांची किमत वाढेल आणि त्या महाग होतील.

त्यामुळे यापुढे जर तुम्ही दारू पिणार असाल तर सोबत ड्रायवर सोबत ठेवा जो दारू पीत नसावा. कारण जर तुम्ही दारू पिऊन अपघात केला आणि त्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर तुमची 7 ते 10 वर्ष तुरुंगात राहण्याची तयारी ठेवा.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : जर तुम्हाला पाहिजे स्वस्त गैस सिलेंडर, तर फक्त बुकिंग करताना वापरा ही ट्रिक


Show More

Related Articles

Back to top button