कोजागरी पौर्णिमा महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असते एकदम खास, करा हे उपाय आणि बना मालामाल

असे बोलले जाते कि धन कमवणाऱ्या व्यक्तीने माता लक्ष्मीची आराधना केली पाहिजे. जर आपल्या भक्तीने माता लक्ष्मी प्रसन्न झाली तर त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवना मध्ये कधीही धन कमी पडणार नाही. या व्यतिरिक्त जर एखाद्या विशेष दिवशी काही उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहतात. हिंदू धर्माच्या अनुसार पौर्णिमा महत्वाची मानली जाते त्यामध्ये देखील आश्विन पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते. यास कोजागरी पौर्णिमा देखील बोलले जाते. यावेळी 13 ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा आहे. असे मानले जाते कि या दिवशी सगळे देवी देवता आपले आशीर्वाद चंद्र प्रकाशाच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचवत असतात तसेच माता लक्ष्मी देखील या दिवशी स्वर्ग लोकातून धरती वर येते आणि महालक्ष्मी मातेला या रात्री जे लोक जागे असल्याचे दिसतात आणि त्यांची पूजा ध्यान करण्यात मग्न असलेले दिसतात त्यांच्यावर माता लक्ष्मी आपली कृपा करते.

कोजागरी पौर्णिमेला चंद्र अतिशय सुंदर दिसतो. ज्योतिष शास्त्र अनुसार जर या दिवशी काही विशेष उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरी स्थायी रूपात वास करते, आज आम्ही आपल्याला या पोस्ट मध्ये कोजागरी पौर्णिमेला कोणते उपाय करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून त्यांची कृपा मिळवू शकता आणि आपण आपल्या जीवना मध्ये धनाच्या संबंधित सगळे कष्ट दूर करू शकता याबद्दल जाणून घेऊ.

कोजागरी पौर्णिमेला हे उपाय केल्याने महालक्ष्मी माता होते प्रसन्न

जर आपण आपल्या जीवनामधील धनाच्या संबंधित समस्येमुळे त्रासले हाते तर या समस्या दूर करू आपण अमाप धन प्राप्त करू इच्छिता तर कोजागरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लावून, त्यानंतर त्यांना गुलाब फुल अर्पण करा, आणि त्यांना पांढरी मिठाई आणि सुगंध अर्पण करा. यानंतर आपण “ॐ ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद महालक्ष्मये नमः” या मंत्राचा 11 वेळा जप करावा. जर आपण हा उपाय केला तर यामुळे आपल्या जीवनामधील धनाच्या संबंधित समस्या दूर होतील.

धनाची देवी माता लक्ष्मी यांना सुपारी अत्यंत प्रिय आहे आणि सुपारी ने त्यांची पूजा देखील केली जाते. त्यामुळे आपण पूजे दरम्यान सुपारी अवश्य ठेवा. पूजा केल्या नंतर आपण सुपारी वर लाल धागा लपेटून त्यास कुंकू, अक्षता, फुल इत्यादीने पूजा केल्यावर आपण यास तिजोरी मध्ये ठेवा. यामुळे जीवनामध्ये कधीही धनाच्या कमीचा सामना करावा लागणार नाही.

कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकर यांना खीर चा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे आपण कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खीर (मसाला दूध) आपल्या घराच्या छतावर चंद्राच्या प्रकाशात ठेवा, त्यानंतर नैवेद्य दाखवल्या नंतर आपण खीर प्रसाद रूपात खावी. असे केल्यामुळे पैश्यांची कमी दूर होते.

आपण आपल्या घरामध्ये पाणी ठेवण्याच्या जागी स्वास्तिकचे चिन्ह काढावे.

कोजागरी पौर्णिमेला जेव्हा चारी बाजूने चंद्रप्रकाश असेल तेव्हा आपण धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा करावी. यामुळे आपल्याला धन लाभ अवश्य प्राप्त होईल कारण ही वेळ माता लक्ष्मीच्या पूजेसाठी अत्यन्त शुभ मानली गेली आहे.