खबरदार… चुकूनही या दिवशी तोडू नका तुळशीची पाने, कायमस्वरूपी होते माता लक्ष्मी नाराज

0
113

हिंदू धर्मा मध्ये तुळशीला मोठे महत्व आहे आणि तुळशी अत्यंत शुभ मानली गेली आहे. तुळशीला देवी स्वरूप मानले गेले आहे. दिवाळी नंतर आपण तुळशी विवाह देखील करतो. घरा मध्ये तुळशी असल्याने अनेक फायदे होतात. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. अशी मान्यता आहे कि तुळशीच्या झाडामध्ये भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते. हीच माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते. एवढेच नाही तर वास्तू अनुसार घरामध्ये तुळशी ठेवल्याने अनेक प्रकारचे वास्तू दोष आपोआप ठीक होतात. त्यामुळे आपल्याला आता समजले असेलच कि तुळशी आपल्यासाठी किती महत्वाची आहे. तुळशीचे आध्यात्मिक लाभ तर आहेतच पण याच सोबत आरोग्याच्या दृष्टीने देखील तुळशी गुणकारी आहे.

आपण देवाची पूजा किंवा इतर काही कामा निमित्त वेळोवेळी तुळशीची पाने तोडत असतो. पण आपल्याला माहीत आहे का काही विशेष दिवशी असे देखील आहेत जेव्हा आपल्याला तुळशीची पाने तोडली नाही पाहिजेत. जर आपण या नियमाचे पालन नाही केले तर आपल्याला आर्थिक समस्यांना होऊ शकतात. तुळशीच्या रोपट्या बाबत काही नियम आहेत ज्यांना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. याच नियमा मध्ये त्याची पाने तोडण्या बद्दल देखील माहिती दिलेली आहे. आज आपण तुळशी संबंधित काही नियमांची माहिती जाणून घेऊ.

तसे तर तुळशीच्या रोपट्याला कधीही सुकू दिले नाही पाहिजे. त्यामुळे यामध्ये नियमित दररोज पाणी दिले पाहिजे. परंतु रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी देण्यास मनाई आहे.

जर आपण आपल्या घरामध्ये तुळशी ठेवली असेल तर आपली जबाबदारी आहे कि आपण सकाळ आणि संध्याकाळ नियमित दररोज तुळशीची पूजा केली पाहिजे. विशेषतः संध्याकाळी तुळशीची जवळ तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित केला पाहिजे.

शास्त्राच्या अनुसार गणपती आणि भगवान शंकर यांना तुळशी कधीही अर्पित केली नाही पाहिजे. असे करणे शुभ मानले जात नाही.

तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गन असतात. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे आपण रोज याचे सेवन करू शकता.

जर आपल्या घरा मध्ये ठेवलेले तुळशीचे रोपटे काही कारणामुळे सुकला असेल तर त्यास मातीच्या बाहेर काढून पाण्यामध्ये प्रवाहित करावे. घरामध्ये तुळशीचे सुकलेले रोपटे किंवा झाड ठेवणे योग्य मानले जात नाही. जुने रोपटे काढल्या नंतर आपण त्या जागी नवीन रोपटे लावू शकता. यामुळे आपल्या घरा मध्ये बरकत टिकून राहील.

वरील नियमांच्या सोबतच अजून एक अत्यंत महत्वाचा नियम आहे तो म्हणजे तुळशीची पाने कोणत्या दिवशी तोडू नयेत. वास्तु अनुसार रविवार, एकादशी आणि ग्रहण असलेल्या दिवशी तुळशीची पाने तोडण्यास मनाई आहे. जर आपण या दिवशी तुळशीची पाने तोडली तर माता लक्ष्मी क्रोधीत होतात आणि आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या येण्यास सुरु होतात.